पाहा VIDEO : 'गर्दन काट दूंगा तेरी', हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्याला धमकी

पाहा VIDEO : 'गर्दन काट दूंगा तेरी', हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची कार्यकर्त्याला धमकी

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना एका कार्यकर्त्याने मुकुट घालण्याचा प्रयत्न केला. मनोहरलाल खट्टर तेव्हा भाषण करत होते. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी त्यांच्याच एका कार्यकर्त्याला 'गर्दन काट दूंगा तेरी' अशी धमकी दिली.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मनोहरलाल खट्टर बरवाला विधानसभा मतदारसंघात जन आशिर्वाद यात्रा घेऊन गेले होते. त्यावेळी ते त्यांच्या रथासारख्या बसमध्ये उभे होते.

याच यात्रेमध्ये त्यांना कुणीतरी फरसा म्हणजे परशुरामाचं अस्त्र मानलं जाणारं छोट्या कुऱ्हाडीसारखं शस्त्र दिलं. त्याचवेळी एका नेत्याने त्यांच्या डोक्यावर मुकुट घालण्याचा प्रयत्न केला. मनोहरलाल खट्टर तेव्हा भाषण करत होते. त्यामुळे त्यांना राग आला. त्यांनी हेच कुऱ्हाडीसारखं शस्त्र त्या कार्यकर्त्याच्या समोर धरलं आणि 'गर्दन काट दूंगा तेरी' अशी धमकी दिली.

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. जर हे मुख्यमंत्री आपल्याच कार्यकर्त्याला असं म्हणत असतील तर मग जनतेशी कसं वागत असतील, असा सवालही त्यांनी विचारला.

खट्टर साहेब को ग़ुस्सा क्यों आता है? असं ट्वीट त्यांनी केलं आहे.सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा झाल्यानंतर खट्टर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हरियाणामध्ये जेव्हा 5 वर्षांपूर्वी आमचं सरकार बनलं तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की कुणीही मंत्र्यांना सोन्याचांदीचे मुकुट घालायचे नाहीत. पण जर कुणी भाजपचा कार्यकर्ता असं करू लागला तर राग येणं स्वाभाविक आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

====================================================================================

VIDEO : भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं, सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या