पणजी, 18 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांवर काही वेळातच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. पणजीमधील मिरामार या बीचवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचं पार्थिव पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. आपल्या लाडक्या नेत्याचं अंतदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित आहे.