गोव्याचे उपाध्यक्ष म्हणाले - देवाच्या कृपेने जिवंत आहेत मनोहर पर्रिकर

गोव्याचे उपाध्यक्ष म्हणाले - देवाच्या कृपेने जिवंत आहेत मनोहर पर्रिकर

ज्या दिवशी पर्रिकर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील किंवा त्यांना काही होईल त्यादिवशी गोव्याच्या राजकारणात मोठं संकट येईल.

  • Share this:

गोवा, 05 फेब्रुवारी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना सध्या दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच (एम्स) मध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. 'पर्रिकर सध्या ईश्वराच्या आशीर्वादावर जगत आहेत' असं गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी सोमवारी म्हटलं आहे.

ज्या दिवशी पर्रिकर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील किंवा त्यांना काही होईल त्यादिवशी गोव्याच्या राजकारणात मोठं संकट येईल. पर्रिकरांची प्रकृती सध्या नाजूक आहे. त्यांना पुन्हा एकदा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पर्रिकरांना कॅन्सरसंबंधी आजार झाला असल्याचं समोर आलं. तेव्हापासून ते दिल्लीच्या एम्स, न्यूयॉर्क, मुंबई आणि गोव्याच्या रुग्णालयांमध्ये भरती होत आहेत. पण दरम्यान, एम्समध्ये भरती होण्यापूर्वी पर्रिकर बुधवारी गोवा विधानसभेच्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 2019-20चा अर्थसंकल्प सादर केला.

मायकल लोबो यांनी सांगितलं की, 'पर्रिकरांना जो आजार आहे, त्यावर कोणता उपचार नाही आहे. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत कोणतंच राजकीय संकट येणार नाही. परंतू ज्या दिवशी ते पदाचा राजीनामा देतील किंवा गंभीररित्या आजारी पडतील, त्यावेळी गोव्यात रायकीय संकट येईल'

'पर्रिकरांच्या राज्यात गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि तीन अन्य अपक्षांच्या समर्थनासह पर्रिकर राज्यात आघाडी सरकारचं नेतृत्व करत आहेत'असं मायकल लोबो म्हणाले आहेत.


#MustWatch आजचे टॉप 5 न्यूज व्हिडिओ पाहा 2.30 मिनिटांत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 5, 2019 08:25 AM IST

ताज्या बातम्या