News18 Lokmat

पर्रिकरांच्या एका निर्णयाने मोदी सरकारचे वाचले 49 हजार 300 कोटी रुपये

भारताने आतापर्यंत इतक्या महाग शस्त्रांची खरेदी केली नव्हती.

News18 Lokmat | Updated On: Mar 18, 2019 03:31 PM IST

पर्रिकरांच्या एका निर्णयाने मोदी सरकारचे वाचले 49 हजार 300 कोटी रुपये

नवी दिल्ली, 18 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या 63 व्या वर्षी निधन झालं. संरक्षण मंत्री असताना भारतीय हवाई दलाने रशियातून शस्त्रास्त्र खरेदी केली. यात त्यांच्या बुद्धीचातुर्यामुळे देशाचे तब्बल 49 हजार 300 कोटी रुपये वाचले होते.

रशियाकडून एस 400 च्या खरेदीच्या चौकशीचे पर्रीकरांनी आदेश दिले होते. इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार एस 400 कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याचा मारा करण्यासाठी मिसाइल खरेदी करण्यात येणार होते. मात्र पर्रिकरांच्या आदेशानंतर हवाई दलाने तांत्रिक अभ्यास केला. त्यानंतर जगातील इतर देशांच्या हवाई दलाच्या शस्त्रास्त्रांची माहिती घेतल्यानंतर कमी आणि मध्यम अंतरावरील मिसाइलची खरेदी कमी केली तर चालेल असं त्यांच्या लक्षात आलं.

एअर डिफेंस स्ट्रॅटेजी तीन प्रकारची असते. त्यात 25 किमीपर्यात अति गंभीर उपकरणांची सुरक्षा, 40 किमी पर्यंत मध्यम अंतर तर त्यापेक्षा जास्त अंतरावरूल सुरक्षेसाठी लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर केला जातो. यानंतर माजी संरक्षण मंत्री पर्रिकरांनी हवाई दलाला लांब पल्ल्याचा मारा करणारी शस्त्रे खरेदी केल्यानंतर कमी आणि मध्यम अंतरावर मारा करणाऱ्या शस्त्रांचा वापर जास्त करावा लागणार नाही हे पटवून दिले.

पर्रिकरांच्या सल्ल्याने भारताने कमी आणि मध्यम अंतरावर मारा करणारी प्रत्येकी 100 शस्त्रे खरेदी केली. एस 400 च्या पाच शस्त्रांची किंमत 6.1 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 427 कोटी इतकी आहे. भारताने आतापर्यंत इतक्या महाग शस्त्रांची खरेदी भारताने केलेली नाही.

VIDEO: मनोहर पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले मोदी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...