'आदरणीय पवार साहेब... राजकारणात इतकी खालची पातळी गाठू नका' : पर्रिकरांच्या मुलाचं जाहीर पत्र

'आदरणीय पवार साहेब... राजकारणात इतकी खालची पातळी गाठू नका' : पर्रिकरांच्या मुलाचं जाहीर पत्र

माझ्या वडिलांबद्दल तुम्ही केलेली टिप्पणी वाचून मी आणि आमचं कुटुंब व्यथित झालो आहोत, असं म्हणत माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल यांनी शरद पवार यांना जाहीर पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

पणजी, 15 एप्रिल : "माझ्या वडिलांबद्दल तुम्ही केलेली टिप्पणी वाचून  मी आणि आमचं कुटुंब व्यथित झालो आहोत", अशी सुरुवात करून उत्पल पर्रिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर प्रथमच असं जाहीर पत्र लिहिलं आहे. या पहिल्याच पत्रातून शरद पवारांना लक्ष्य केलं आहे.

राजकीय फायद्यासाठी माझ्या वडिलांचं नाव अयोग्य ठिकाणी खोटेपणाने वापरण्याचा हा प्रयत्न अगदी असंवेदनशील आणि दुर्दैवी आहे, असं म्हणत उत्पल पर्रिकर यांनी पवारांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

"मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली होती. त्यानंतर गोव्यातल्या जनतेसाठी ते पुन्हा राज्यात आले आणि शेवटपर्यंत गोव्याच्या जनतेची सेवा करत राहिले. ते कायम जनतेचे नेते होते. राफेल प्रकरणानंतर ते गोव्यात परतले असंतुमचं म्हणणं अगदी खोडसाळपणाचं आहे.

माझे वडील जीवघेण्या आजाराशी लढत असतानाही काही नेत्यांनी त्यांचं नाव वापरून गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी स्वतः वडिलांनीच त्याला चोख प्रत्युत्तर देत तो हाणून पाडला होता. आता ते हयात नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावावर कुणी खोटी माहिती पसरवून राजकारण केलं जात आहे. भारतीय राजकारणानं गाठलेलं खालच्या पातळीचं हे निदर्शक आहे", असंही उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

मनोहर पर्रिकरांची दोन्ही मुलं राजकारणापासून दूर का?


पर्रिकरांच्या एका निर्णयाने मोदी सरकारचे वाचले 49 हजार 300 कोटी रुपये"तुम्ही वक्तव्य केलंच आहे, तर मलाही माझ्या वडिलांची खरी बाजू पुन्हा एकदा मांडली पाहिजे. ते एक प्रामाणिक आणि स्वच्छ नेते होते. देशाच्या आणि राज्याच्या भल्यासाठी त्यांनी काम केलं. राफेल लढाऊ विमानांची खरेदी हा त्यांच्या संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय होता. हा निर्णय घेणाऱ्यांमध्ये मनोहर पर्रिकरच आघाडीवर होते. नंतर गोव्याच्या जनतेसाठी ते पुन्हा राज्यात आले", असं लिहिताना त्यांच्या परत येण्याचा राफेल खरेदी प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं उत्पल पर्रिकर यांनी पत्रातून स्पष्ट केलं आहे."तुम्ही स्वतः संरक्षणमंत्री होतात. आपल्या शूर सैनिकांसाठी अशी आयुधं किती महत्त्वाची आहेत, याची तुम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आपल्या सैन्याची ताकद कमी करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अपप्रचारात तुम्ही सहभागी होताय हे पाहून निराशा वाटली."

ज्या लोकांनी माझे वडील आजारी असताना साधी चौकशी करण्याचंही सौजन्य दाखवलं नाही, ते आता त्यांच्या नावाचा राजकीय वापर करत आहेत, हे बघून वाईट वाटलं.

मी तुम्हाला विनंती करतो की, असं पुन्हा करू नये, आम्हाला आणि गोव्याच्या जनतेला आदरणीय पर्रिकरांच्या आठवणीत शांतपणे जगू द्यावं", असं या इंग्रजीतून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


VIDEO: आझम खान यांच्या 'खाकी अंडरवेअर' वक्तव्यावर काय म्हणाले रामदास आठवले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 07:03 PM IST

ताज्या बातम्या