'काही दिवसात गोव्याला परत येणार', मनोहर पर्रिकरांचा व्हिडिओ मेसेज

अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर येत्या काही आठवड्यात भारतात परतणार आहेत. एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 13, 2018 09:40 PM IST

'काही दिवसात गोव्याला परत येणार', मनोहर पर्रिकरांचा व्हिडिओ मेसेज

13 मे : अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर येत्या काही आठवड्यात भारतात परतणार आहेत. एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

गोव्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पर्रिकर यांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. 62 वर्षीय मनोहर पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या आजारानं त्रस्त असून त्यांच्यावर सध्या अमेरिकेतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते अमेरिकेला रवाना झाले होते. तत्पूर्वी त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान पर्रिकरांच्या अनुपस्थितीत गोव्याला नवा कारभारी द्या अन्यथा असंवैधानिक पद्धतीनं स्थापण करण्यात आलेलं गोव्याचं पर्रिकर सरकार बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

पर्रिकरांच्या अनुपस्थितीत गोव्याच्या मंत्रीमंडळातील तीन कॅबिनेट मंत्र्यांची सल्लागार समिती गोवा सरकारचा कारभार चालवीत आहे. या समितीमध्ये सुदीन ढवळीकर (एमजीपी), फ्रान्सिस डिसुझा (भाजपा) आणि विजय सरदेसाई (जीएफपी) या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2018 09:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...