राफेल वाद : मनोहर पर्रिकरांच्या सुरक्षेत वाढ करा, राष्ट्रपतींना पत्र

राफेल करारातील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांच्याकडून पर्रिकरांना धोका आहे, असा आरोप करत मनोहर पर्रिकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 6, 2019 09:01 AM IST

राफेल वाद : मनोहर पर्रिकरांच्या सुरक्षेत वाढ करा, राष्ट्रपतींना पत्र

पणजी, 6 जानेवारी : गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर पर्रिकर यांच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 'ज्यांना राफेल कराराची माहिती बाहेर येऊ नये असं वाटतं, त्यांच्यापासून पर्रिकरांना धोका आहे, असं म्हणत ही मागणी करणारं पत्र गोवा काँग्रेसने राष्ट्रपतींकडे पाठवलं आहे.

राफेलबाबतच्या कथित ऑडिओ क्लिप वरून संसदेत झाला होता गोंधळ झाला होता. त्यानंतर आता गोवा काँगेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्र लिहित मनोहर पर्रिकरांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. राफेल करारातील भ्रष्टाचार बाहेर येऊ नये असं ज्यांना वाटतं त्यांच्याकडून पर्रिकरांना धोका आहे, असा आरोप करत काँग्रेसने अप्रत्यक्षपणे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे ऑडिओ क्लिप वाद?

राफेल कराराबाबतची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे, असा दावा करत काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.

ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर काँग्रेसने राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 'ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे मंत्री म्हणत आहेत की मनोहर पर्रिकरांकडे राफेलची महत्त्वाची माहिती आहे. मग राफेल कराराचं कोणतं रहस्य पर्रिकरांकडे आहे? सरकार राफेलच्या जेपीसी चौकशीला का घाबरत आहे?' असे अनेक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहेत.

Loading...काय आहे राफेल प्रकरण?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी किंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे.

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.


राफेलवरून नरेंद्र मोदींवर पुन्हा बरसले राहुल गांधी, पाहा लोकसभेतील UNCUT भाषण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2019 09:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...