...जेव्हा मनोहर पर्रीकरांनी एका झटक्यात 11 रुपयांनी स्वस्त केलं होतं पेट्रोल

...जेव्हा मनोहर पर्रीकरांनी एका झटक्यात 11 रुपयांनी स्वस्त केलं होतं पेट्रोल

मनोहर पर्रीकरांनी पेट्रोलच्या किंमती 11 रुपयांनी घटवल्या आणि एका रात्रीतच त्यांची ख्याती देशभरात पसरली

  • Share this:

पणजी, 18 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (17 मार्च)निधन झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाविरोधात लढा देत होते. अखेर त्यांची ही झुंज रविवारी संपली. मनोहर पर्रीकर तीन वेळा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. साधी राहणी आणि प्रामाणिकता अशी पर्रीकरांची ओळख. त्यांच्या लोकप्रियतेची असंख्य उदाहरणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे 2017मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर होतं, त्यावेळेस अन्य राजकीय पक्षांनी केवळ पर्रीकरांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर आपलं समर्थन दिलं होतं.

लहानपणीच आरएसएससोबत जुळली नाळ

मनोहर पर्रीकर लहानपणापासून आरएसएससोबत जोडले गेले होते. 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 1994मध्ये ते पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकले होते. जून 1999 मध्ये त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. 24 ऑक्टोबर 2000 मध्ये ते पहिल्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले मात्र या पदावर ते केवळ दोन वर्षच राहू शकले. 2002 मध्ये ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. 2005 मध्ये भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यानं त्यांचं सरकार संकटात आलं होतं, मात्र एका महिन्यातच त्यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केलं. 2012मध्ये ते तिसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळेस मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी गोव्यात पेट्रोलच्या किंमतीमध्ये एक झटक्यात 11 रुपयांची घट केली होती. या निर्णयामुळे त्यांची ख्याती एका रात्रीतच संपूर्ण देशात पसरली. त्यांनी गोव्यामध्ये 'गृह आधार' (गृहिणींसाठीची योजना) आणि 'लाडली लक्ष्मी' यांसारख्या योजना अंमलबजावणी केली. याच योजना अन्य राज्यांद्वारे देखील राबवल्या गेल्या.

वाचा अन्य बातम्या

...जेव्हा मनोहर पर्रिकर हे सगळ्यात आधी मोदींच्या बाजूने उभे राहिले होते

कोण ठरणार गोव्याचा नवा मुख्यमंत्री? नितीन गडकरींच्या उपस्थितीत होणार घोषणा

जड अंतःकरणाने या बॉलिवूड कलाकारांनी वाहिली मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली

गर्ल्स कॉलेजमध्ये शिक्षकाने दिला सेक्स क्लास, VIDEO व्हायरल

First published: March 18, 2019, 8:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading