मनोहर पर्रिकरांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

मनोहर पर्रिकरांनी बोलवली मंत्रिमंडळाची बैठक, गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजाराबद्दल खुलासा केला

  • Share this:

गोवा, ३१ ऑक्टोबर २०१८- गेल्या काही महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी असलेल्या पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. पर्रीकरांना पर्याय कोणता द्यावा या विवंचनेत सध्या भाजप असून भाजपात ज्येष्ठ नेत्यानी बंडखोरीही केली आहे. अशा परिस्थितीत काल विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांनी त्यांची राहत्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या पर्रीकर यांच्यावर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत.

दरम्यान, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजाराबद्दल खुलासा केला. पर्रिकर हे पॅनक्रियटिक कँसर या आजाराने ग्रस्त असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे अशी माहिती राणे यांनी दिली. पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री आहे पण त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना पॅनक्रियटिक कँसर  झाला आहे. हे आता लपवून ठेवता येणार नाही असं राणे यांनी सांगितलं.

पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल सर्वांना माहिती आहे. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर ते घरी आहे. त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहु द्या, ते सध्या ठीक आहे. गोवाच्या जनतेची सेवा केल्यानंतर जर त्यांना आपल्या कुटुंबासोबत या परिस्थिती राहावं लागत असेल तर आपण त्यांच्या विचारण करणे योग्य नाही. याबद्दल त्यांचे कुटुंबिय सांगू शकतील मी नाही असंही राणे यांनी स्पष्ट केले.

पार्सेकरांचा गंभीर आरोप

दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मनोहर पर्रिकरांच्या आजारपणाचं भाजप गोव्यात गोवेकरांचा विश्वासघात करणारं अत्यंत हीन दर्जाच राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.

गोव्यात भाजप नेतेच भाजप संपवण्याचं काम करत असल्याची टीकाही पार्सेकर यांनी केली. ज्या आमदाराकडून मी पराभूत झालो त्याला पक्षात घेताना किमान आपल्याला माहिती द्यावीशीही भाजपाच्या नेत्यांना वाटत नाही याबाबत पार्सेकरानी संताप व्यक्त केला होता.

VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट दिव्याच्या खांबावर

First published: October 31, 2018, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading