गोव्यात 'बीफ' कमी पडू देणार नाही, मनोहर पर्रिकरांचं वक्तव्य

गोव्यात 'बीफ' कमी पडू देणार नाही, मनोहर पर्रिकरांचं वक्तव्य

गोव्यामध्ये गोमांस कमी होण्याची समस्या निर्माण झाली तर इतर राज्यातून बीफ मागवण्याचा पर्याय खुला आहे अशी माहिती पर्रिकर यांनी विधानसभेत दिली

  • Share this:

18 जुलै : गोव्यात 'बीफ' कमी पडू देणार नाही, जर कमी पडलं तर शेजारील केरळ राज्यातून मागवून घेऊ असं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून काँग्रेसने पर्रिकर यांचं विधान हास्यास्पद असल्याची खिल्ली उडवलीये.

एकीकडे देशभरात कथित गोरक्षकांनी उच्छाद मांडलाय. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कथित गोरक्षकांना सज्जड दमही दिलाय. पण दुसरीकडे गोवा विधानसभेत मुख्यमंत्री पर्रिकर यांनी गोमांस बंदीवर विधान करून खळबळ उडवून दिलीये. गोव्यामध्ये 'बीफ' कमी होण्याची समस्या निर्माण झाली तर इतर राज्यातून बीफ मागवण्याचा पर्याय खुला आहे अशी माहिती पर्रिकर यांनी दिली.

भाजपचे आमदार निलेश कबराल यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला उत्तर देतानाही त्यांनी गोव्यात इतर राज्यातून येणाऱ्या मांसाची वैद्यकीय डाॅक्टरांकडून तपासणी केली जाईल अशी हमीही दिली.

राज्यात एकमात्र फोंडा इथं कायदेशीर कत्तलखाना गोवा मीट काॅम्प्लेक्समध्ये दररोज 2000 किलो 'बीफ'चं उत्पादन होतं. बाकीचं 'बीफ' हे कर्नाटकमधून आणलं जातं. पण शेजारील राज्यातील जनावरांना इथं आणून कत्तल करण्यास सरकारचा कोणताही विचार नाही असंही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं.

मनोहर पर्रिकर यांच्या या वक्तव्याचा काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी समाचार घेतला. भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य हास्यास्पद आणि चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading