गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गोव्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

23 फेब्रुवारी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना  गोव्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर एंडोस्कोपीसाठी करण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची डाॅक्टरांनी माहिती दिली. पुढील 48 तास त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

मनोहर पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत.मागच्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पर्रिकरांना कॅन्सरसंबंधी आजार झाला असल्याचं समोर आलं. तेव्हापासून ते दिल्लीच्या एम्स, न्यूयॉर्क, मुंबई आणि गोव्याच्या रुग्णालयांमध्ये भरती होत आहेत.

दरम्यान, एम्समध्ये भरती होण्यापूर्वी पर्रिकर यांनी गोवा विधानसभेच्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 2019-20चा अर्थसंकल्प सादर केला होता.

मध्यंतरी, गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी सांगितलं की, 'पर्रिकरांना जो आजार आहे, त्यावर कोणता उपचार नाही आहे. जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत कोणतंच राजकीय संकट येणार नाही.'

'पर्रिकरांच्या राज्यात गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि तीन अन्य अपक्षांच्या समर्थनासह पर्रिकर राज्यात आघाडी सरकारचं नेतृत्व करत आहेत'असं मायकल लोबो म्हणाले आहेत.

===============================

First published: February 23, 2019, 11:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading