राजकीय स्वार्थासाठी खट्टर सरकारने हरियाणा जळू दिलं - हायकोर्ट

राजकीय स्वार्थासाठी खट्टर सरकारने हरियाणा जळू दिलं - हायकोर्ट

सरकार आंदोलकांना शरण गेलं असं दिसंतय' असंही हायकोर्ट म्हणालं. याच पार्श्वभूमीवर खट्टर यांना भाजपश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं आहे.

  • Share this:

 

चंदीगड,26 ऑगस्ट: बाबा राम रहीम यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर काल हरियाणात प्रचंड हिंसाचार झाला. 30 हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. याच पार्श्वभूमीवर चंदीगड  हायकोर्टाने हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना या हिंसाचारासाठी फटकारलं आहे.

'राजकीय स्वार्थासाठी मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणा जळू दिलं' अशी टीका हायकोर्टाने केली आहे. 'सरकार आंदोलकांना शरण गेलं असं दिसंतय' असंही हायकोर्ट म्हणालं. याच पार्श्वभूमीवर खट्टर यांना भाजपश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावलं आहे. खट्टर यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान हरियाणा प्रकरणी भाजपा अध्यक्ष अमित शाह, हरियाणा प्रभारी महासचिव अनिल जैन आणि कैलाश विजयवर्गीय यांची भाजपा मुख्यालयात बैठक  घेण्यात आली आहे.दरम्यान कांग्रेसने हरियाणात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.तर दुसरीकडे खट्टर यांना सरकारने  गृहमंत्रालयाच्या बैठकीत खट्टर यांना क्लिन चिट दिली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2017 01:35 PM IST

ताज्या बातम्या