मोदी 2.0: 'मन की बात'; पाणी संकटावर पंतप्रधानांनी दिला 'हा' सल्ला!

मोदी 2.0: 'मन की बात'; पाणी संकटावर पंतप्रधानांनी दिला 'हा' सल्ला!

Mann ki Baatमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पाणी प्रश्नावर भाष्य केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जून : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ यात्रा, पाणी आणि योगा विषयांवर 'मन की बात' केली. 'मी सत्तेत आलो नाही तर लोकांनी मला निवडून दिलं. देशातील जनतेला विकास हवा आहे. त्यांच्या सेवेची मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले. तसंच निवडणूक प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ यात्रेवर गेले होते. त्यावर बोलताना त्यांनी केदारनाथ यात्रेमुळे माझा रिकामेपणा भरण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसंच रोजच्या धावपळीतून वेळ काढून पुस्तक वाचत जा असा सल्ला देखील त्यांनी देशातील जनतेला दिला.

काय सांगताsss चालकाने छत्री धरून चालवली केडीएमसीची गळकी बस

पाणी प्रश्नावर काय म्हणाले नरेंद्र मोदी

देशात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ आहे. पाणी संवर्धनासाठी मी देशातील सर्व सरपंचांना पत्र लिहिलं होतं. त्याला त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. आपल्या देशात पावसाचं केवळ 8 टक्के पाणी वाचवलं जातं. त्यामुळे भविष्यात यावर अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जन, जन जुडेगा जल बचेगा असा संदेश देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. शिवाय, पाण्याच्या संवर्धनासाठी ज्या संस्था, लोक पुढाकार घेत आहेत त्यांची माहिती गोळा करण्याचं आवाहन देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं. सर्वांनी पावसाचं पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून सोशल मीडियावर #JanShakti4JalShakti वापरून आपला मजकूर अपलोड करण्याचं आवाहन देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शिवाय, योगाबद्दल देखील नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये भाष्य केलं.

दुबईमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली 4 महिलांना बनवलं ‘बार डान्सर’

केव्हा केली होती 'मन की बात'

यापूर्वी त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी शेवटची ‘मन की बात’ केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी प्रचाराला झोकून दिलं होतं. 30 मे रोजी दुसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा ‘मन की बात’द्वारे पुन्हा एकदा देशातील लोकांशी संवाद साधला.

ब्रेकअपचा बदला, प्रेयसीवर केले 12 वार आणि स्वत:चाही चिरला गळा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading