मनमोहन सिंग गुजरात दौऱ्यावर

मनमोहन सिंग गुजरात दौऱ्यावर

आज गुजरातमध्ये सिंग यांची पत्रकार परिषद होणार आहे.

  • Share this:

 अहमदाबाद,07 नोव्हेंबर: गुजरातच्या रणधुमाळीत आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंगही उतरले आहेत. गुजरात निवडणुकांसाठी मनमोहन सिंह एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत.

गुजरात निवडणूकीला आता फक्त एका महिन्याचा अवधी आहे. आता प्रचारात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगही सहभागी होणार आहे. आज गुजरातमध्ये सिंग यांची पत्रकार परिषद होणार आहे. आता गुजरातच्या रणधुमाळीत मनमोहन सिंगही सहभागी होणार आहे. मनमोहन सिंग आज एक दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर गुजरातमध्ये आज एक व्याख्यान देणार आहे. व्याख्यानानंतर मनमोहन सिंग पत्रकार परिषद घेतील. अहमदाबादमध्ये आज डॉ. मनमोहन सिंग पत्रकार परिषद घेत आहेत. गेले अनेक दिवस राहुल गांधीही गुजरातमध्ये प्रचार करत आहेत. तसंच पंतप्रधान मोदीही गुजरातमध्ये प्रचार सभा घेत आहेत.

त्यामुळे गुजरातची निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची झाली आहे. पुढच्या महिन्यात गुजरात विधानसभेसाठी मतदान होणार असून त्यात कोण जिंकतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 08:53 AM IST

ताज्या बातम्या