काँग्रेसमध्येच महाभियोगावरून मतभेद?;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही

काँग्रेसमध्येच महाभियोगावरून मतभेद?;मनमोहन सिंग, खुर्शीद यांचा पाठिंबा नाही

मनमोहन सिंह , खुर्शीद यांच्याशिवाय पूर्व वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील या प्रक्रियेला पाठिंबा दिलेला नाही. तर मनमोहन सिंहाना आम्हीच दुर ठेवलंय असं सिब्बल यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

20 एप्रिल:  सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश  दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग आणायच्या तयारीत   काँग्रेस  आणि इतर 6 पक्ष असतानाच  काँग्रेसमध्येच या विषयावरून फूट पडतेय की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण पूर्वपंतप्रधान मनमोहन सिंह आणि सलमान खुर्शीद यांनी काही या महाभियोगाला पाठिंबा दिलेला नाही. मनमोहन सिंह काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आहे.

जज लोया प्रकरणाचा निकाल काल सुप्रीम कोर्टाने दिला. या निकालात प्रकरणाची चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला  आहे. या प्रकरणी निकाल देणारं खंडपीठ सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचं होतं. अशा अजूनही कारणांनी काँग्रेसने महाभियोगाच्या प्रस्तावाची तयारी केलीय. यासंदर्भात आज  उपराष्ट्रपतींची भेटही घेण्यात आली.

महाभियोगही अत्यंत  गंभीर गोष्ट असते. एखादा निकाल आपल्या विरोधात गेला म्हणून महाभियोग आणणं कितपत योग्य आहे मला माहित नाही. मी या कशाचाच भाग नसून मी काही प्रतिक्रिया ही व्यक्त करणार नाही असं खुर्शीद यांनी स्पष्ट केलं आहे. खुर्शीद सुप्रीम कोर्टात वकिल म्हणून कार्यरत आहे.मनमोहन सिंह , खुर्शीद यांच्याशिवाय पूर्व वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी देखील या प्रक्रियेला पाठिंबा दिलेला नाही.  तर मनमोहन सिंहाना  आम्हीच दुर ठेवलंय  असं सिब्बल यांनी स्पष्ट केलं.

 

आता या महाभियोगाचं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 08:27 PM IST

ताज्या बातम्या