मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा हटवली, मोदींसह फक्त 4 जणांनाच 'सुरक्षाकवच'!

मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा हटवली, मोदींसह फक्त 4 जणांनाच 'सुरक्षाकवच'!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली असून यापुढे त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली जाणार असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिळणारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. मात्र, त्यांची झेड प्लस सुरक्षा कायम राहणार आहे. भारत सरकारनं मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल मिळाल्यानंतरच हा निर्णय घेतला आहे. यावर गुप्तचर संस्थांकडून मिळालेली माहिती आणि त्यावर कॅबिनेट सचिव आणि गृहमंत्रालय यांनी समीक्षा केल्यानंतर एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती एका पत्राद्वारे मनमोहन सिंग यांना देण्यात आली आहे.

एसपीजी सुरक्षा व्यवस्थेसाठी सध्या आयटीबीपी, सीआरपीएफ, सीआयएसएपचे 3 हजारपेक्षा जास्त जवान कार्यरत आहेत. पंतप्रधान मनमोहनसिंग यांची सुरक्षा हटवल्याची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एसपीजी अॅक्ट 1988 नुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना किती धोका आहे याची माहिती घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याची समीक्षा केली जाते. सर्व सुरक्षा यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर बैठक घेऊन त्यांच्या सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय घेतला.

मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर आता अशी सुरक्षा देशात फक्त चारच लोकांना देण्यात येत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा दिली जाते.

SPECIAL REPORT: भाभीजीला पाकिस्तानला जाण्याची चटक, दिलं हे चॅलेंज!

First published: August 26, 2019, 11:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading