'हे वागणं पंतप्रधानपदाला शोभत नाही', मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल

'हे वागणं पंतप्रधानपदाला शोभत नाही', मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा हिरेव्यापारी नीरव मोदी हा फरार होण्याआधी दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

  • Share this:

08 मे : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'मोदी सध्या जी भाषा वापरत आहेत, तशी याआधी कोणत्याच पंतप्रधानांनी वापरली नाही. हे वागणं पंतप्रधानपदाला शोभत नाही आणि ते या पदाचा मान-सन्मान कमी करत आहेत', असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणारा हिरेव्यापारी नीरव मोदी हा फरार होण्याआधी दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मनमोहन सिंग म्हणाले की, 'नीरव मोदीच्या बाबतीत म्हणाल तर, २०१५-१६ मध्ये तो व्यवहार करत होता, त्यावेळी मोदी सरकारनं कोणतीच कार्यवाही केली नाही, हे आपण निश्चित म्हणू शकतो. पंतप्रधान मोदी दावोसमध्ये होते, त्यावेळी नीरव मोदी आणि त्याचे सहकारीही त्यांच्यासोबत होते. यानंतर काही दिवसांनी नीरव पसार झाला. मोदी सरकारनं कोणकोणती कामे केली आहेत, हे यावरूनच स्पष्ट होते', असा टोलाही त्यांनी लगावलाय.

नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावरूनही मनमोहन सिंग यांनी मोदींवर हल्ला चढवला. मोदी सरकारनं नोटाबंदी आणि जीएसटी लागू करण्यासंबंधी घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. या निर्णयांमुळं अर्थव्यवस्थेच्या झालेल्या नुकसानीमुळं लघु आणि मध्यम उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत. हजारो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, असं सिंग म्हणाले.

 

First published: May 8, 2018, 8:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading