02 डिसेंबर : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दुसऱ्या तिमाही जीडीपीत झालेल्या वाढीचं स्वागत केलंय. पण जीडीपीच्या बाबतीत मोदी सरकार यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारभाराशी बरोबर करू शकणार नाही असा टोलाही मनमोहन सिंह यांनी लगावला.
जीडीपीमध्ये घसरण झाल्यानंतर जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी 6.3 इतका राहिलाय. मोदी सरकारसाठी हा दिलासा ठरलाय. मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारला सावधानतेचा इशारा दिलाय. पाच तिमाहींमध्ये जीडीपीत चढउतार झालाय त्यामुळे लगेच जीडीपी वाढला असं म्हणणे घाईचे ठरेल असा सल्ला सिंह यांनी दिलाय.
राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी अध्यक्ष प्रणव सेन आणि अर्थशास्त्रज्ञ एम गोविंद राव यांच्या हवाला देत मनमोहन सिंह म्हणाले, जीडीपीमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अनुसार 2017-18 मध्ये जीडीपी 6.7 टक्काने गती येईल, जर हाच दर चालू वर्षात कायम राहिला तर मोदी सरकारचा चार वर्षांचा कार्यकाळाचा गती हा 7.1 टक्के इतका राहणार आहे.
मनमोहन सिंह यांनी दावा केला आहे की, यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळात जितका जीडीपी राहिला होता त्याची बरोबरी मोदी सरकार करू शकणार नाही. जर मोदी सरकारला बरोबरी करायची असेल तर आर्थिक दर हा 10.6 इतका गाठवा लागणार आहे. जर असं झालं तर मला आनंदच आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
आर्थिक विकास दरात जर एक टक्का कमी झाला तर देशाचे 1.5 लाख कोटीचे नुकसान होतं. ज्या लोकांना नोकऱ्या जातात, ज्या कंपन्या बंद होतात, ज्या कंपन्या व्यवसायातून बाहेर पडतात त्यांना हे खूप निराशादायक ठरते असंही मनमोहन सिंह यांनी म्हटलंय.
2017-18 मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये आर्थिक विकास दर 5.7 टक्के हा नोटबंदीमुळे झाला होता. त्यामुळे अजूनही नोटबंदीचा प्रभाव बाजारावर आहे. यातून अजूनही लोकांची सुटका झालेली नाही असंही सिंह यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी दर 6.3 राहिला. उत्पादन क्षेत्रात पुन्हा गती आली पण जीएसटी लागू झाल्यामुळे उत्पादन क्षेत्रात मंदी आली.