S M L

भारतावर माझं जेवढं प्रेम, तेवढंच प्रेम पाकिस्तानवरही-मणिशंकर अय्यर

पाकिस्तान भेटीवर गेलेले काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2018 02:10 PM IST

भारतावर माझं जेवढं प्रेम, तेवढंच प्रेम पाकिस्तानवरही-मणिशंकर अय्यर

13 फेब्रुवारी : पाकिस्तान भेटीवर गेलेले काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे. 'भारतावर माझं जेवढं प्रेम आहे, तेवढंच प्रेम पाकिस्तानवरही आहे,' असं वक्तव्य अय्यर यांनी केलं आहे. भारत आणि पाकिस्तानचे संबध सुधारायचे असेल तर दोन्ही देशांत चर्चा व्हायला पाहिजे, असं सांगतानाच दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुकही केलं आहे.

कराचीत एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मणिशंकर अय्यर आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. 'कोणत्याही अटी-शर्तीविना चर्चा करत राहणं हाच भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याचा एकमेव पर्याय आहे. चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न योग्यच आहे. पण नवी दिल्लीकडे हे धोरण नाही,' अशी टीकाही त्यांनी केली.

'भारत-पाकिस्तानने एकत्र बसून चर्चेद्वारे प्रश्न सोडविणे ही काळाची गरज आहे,' असंही त्यांनी सांगितलं.'काश्मीर समस्या आणि भारताविरोधात होणारा दहशतवादाचा वापर हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न निकाली काढायचे असतील तर जनरल परवेज मुशर्रफ यांच्या धोरणांचा पाठपुरावा करायला हवा,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close