Manipur Terrorist Attack: आधी IED ब्लास्ट, नंतर थेट गोळीबार; असा होता म्यानमार बॉर्डरवरचा अतिरेकी हल्ल्याचा थरार
Manipur Terrorist Attack: आधी IED ब्लास्ट, नंतर थेट गोळीबार; असा होता म्यानमार बॉर्डरवरचा अतिरेकी हल्ल्याचा थरार
अतिरेक्यांनी नेमका हल्ला कसा केला, याबाबतची माहिती आता समोर आलीय
Manipur Terrorist Attack: मणिपूर नागा पीपल्स फ्रंट (Manipur Naga People's Front) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याबाबत तपास करत आहेत.
इम्फाल, 14 नोव्हेंबर : मणिपूरमध्ये (Manipur) आसाम रायफल्सच्या (Assam Rifles) जवानांच्या ताफ्यावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने (Terrorist Attack) संपूर्ण देश हादरला आहे. मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भयानक आणि घातक अतिरेकी हल्ला असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात एक कर्नल आणि चार जवान शहीद झाले आहेत. यासोबतच कर्नल विप्लव त्रिपाठी (Colonel Viplav Tripathi) यांची पत्नी आणि मुलाचादेखील मृत्यू झाला आहे. मणिपूर नागा पीपल्स फ्रंट (Manipur Naga People's Front) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याबाबत तपास करत आहेत. या तपासात आता हा हल्ला नेमका कसा झाला याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे.
नेमका हल्ला कसा झाला?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम रायफल्सच्या जवानांचा एक ताफा शनिवारी (13 नोव्हेंबर) कमांडिंग ऑफिसर फॉरवर्ड कॅम्पहून बटालियन मुख्यालाच्या दिशेला निघालं होतं. यावेळी गाडीत कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांच्या पत्नी आणि मुलगाही होता. त्यांच्यासह गाडीत अनेक जवानही होते. या दरम्यान चुराचांदपूर जिल्ह्यातील सिंघट येथील म्यानमार बॉर्डरजवळ अतिरेक्यांनी या ताफ्यावर हल्ला चढवला. अतिरेक्यांनी जवानांच्या ताफ्यावर आधी थेट IED हल्ला केला. त्यानंतर त्यांनी थेट फायरिंग करायला सुरुवात केली.
हेही वाचा- ट्रॅक्टरच्या धडकेत वाचले पण ट्रकनं चिरडलं; जीवलग मित्रांचा रस्त्यावरच तडफडून गेला प्राणअतिरेक्यांना जवानांचं तोडीस तोड प्रत्युत्तर
उग्रवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ताफ्यातील काही जवान पुढे आले. यावेळी जवान आणि अतिरेकी यांच्यात काहीशी चकमक झाली. पण हल्ल्यानंतर अनेक अतिरेकी पळून गेले. तर काही अतिरेकी जखमी झाले. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे चार जवान जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच एक कर्नलसह चार जवानांचा मृत्यू झालाय.
हेही वाचा : 25 वर्षांपूर्वी सोडलं घर; उच्चशिक्षित मिलिंद तेलतुंबडे नक्षली चळवळीकडे कसा वळला?पंतप्रधान मोदींकडून संवेदना व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती ट्विटरवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केलीय.
Strongly condemn the attack on the Assam Rifles convoy in Manipur. I pay homage to those soldiers and family members who have been martyred today. Their sacrifice will never be forgotten. My thoughts are with the bereaved families in this hour of sadness.
हेही वाचा : मुलाच्या वाढदिवशी घरी येण्याचं वचन, पण अतिरेकी हल्ल्यात निधन; शहीद जवानाची मनाला चटका लावणारी एक्झिट
"मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. आज शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही मृतकांच्या कुटुंबियांसोबत आहोत", अशा शब्दात मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Published by:Chetan Patil
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.