रात्रीस खेळ चाले! उपमुख्यमंत्र्यांनी इथेही दिला भाजपला जोरदार धक्का

रात्रीस खेळ चाले! उपमुख्यमंत्र्यांनी इथेही दिला भाजपला जोरदार धक्का

आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेलं सत्तानाट्य आणि रात्रीत बदललेला राजकारणाचा खेळ अजून जनता विसरलेली नाही. आता त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे ईशान्येकडच्या राज्याने.

  • Share this:

इम्फाळ, 17 जून : आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात रंगलेलं सत्तानाट्य आणि रात्रीत बदललेला राजकारणाचा खेळ अजून जनता विसरलेली नाही. आता त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे ईशान्येकडच्या राज्याने. मणिपूरमधल्या भाजप सरकारला पुन्हा एकदा रात्रीतच धक्का बसला आहे, तेही उपमुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिल्यामुळे.

एका रात्रीत भाजपच्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. पण अवघ्या तीन दिवसात या उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत भाजपला धक्का दिला आणि भाजपचं सरकार अगदीच अल्पजीवी ठरलं. आता मणिपूरमध्ये एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार संकटात सापडलं आहे. उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंग यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार संकटात सापडलं आहे.

सुरुवातीला 3 भाजप आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एस सुभाषचंद्र सिंह, टीटी हाओकिप आणि सॅमुअल जेंदई यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर थेट नॅशनल पीपल्स पार्टीचे (NPP)नेते आणि उपमुख्यमंत्री वाय. जॉयकुमार सिंग यांनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचं सरकार कोसळण्याच्या बेतात आहे. आत्तापर्यंत 9 आमदारांनी राजीनामा दिला असून त्या सगळ्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

काय होणार रात्रीत?

भाजपचं सरकार अल्पमतात आल्याने आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकतं. ओकराम इबोबी यांना मणिपूरचे मुख्‍यमंत्री करण्याचा पूर्ण प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येईल. बहुमत सिद्ध झालं तर तेच मुख्यमंत्री होऊ शकतात.

'आत्मनिर्भर'च्या गप्पा मारून झाल्यावर 'हे' रद्द करा, आव्हाडांचा मोदींना निशाणा

काय निर्णय घेणार ठाकरे सरकार? चकमकीपूर्वी चिनी कंपन्यांसोबत झाला होता करार

First published: June 17, 2020, 10:24 PM IST
Tags: manipur

ताज्या बातम्या