कोरोनाचं थैमान सुरू असताना आनंदाची बातमी, अरुणाचलनंतर 'हे' राज्य कोरोनामुक्त

कोरोनाचं थैमान सुरू असताना आनंदाची बातमी, अरुणाचलनंतर 'हे' राज्य कोरोनामुक्त

31 मार्च रोजी 65 वर्षीय वृद्धाला मणिपुरातील RIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्याक्रमासाठी उपस्थित होता.

  • Share this:

इन्फाळ, 19 एप्रिल : देशभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. एका बाजूला नागरिकांची भीती वाढत असताना दुसरी दिलासा देणारी बातमी आहे. देशातील काही परिसर कोरोनामुक्त होण्यात यश मिळत आहे. अरुणाचल नंतर आता मणिपूरही कोरोना मुक्तच्या दिशेनं वाटचाल करत आहे. मणिपूरमध्ये दुसरा रुग्णही चाचणीनंतर निगेटिव्ह आला आहे. 65 वर्षांच्या रुग्णावर कोरोनाचे RIMS मध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावरील उपचारानंतर तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

याआधीच्या दोन टेस्ट आल्या होत्या पॉझिटिव्ह

31 मार्च रोजी 65 वर्षीय वृद्धाला मणिपुरातील RIMS रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. हा रुग्ण दिल्लीतील निजामुद्दीन इथे झालेल्या तबलिगी जमातच्या कार्याक्रमासाठी उपस्थित होता. मणिपूरमध्ये कोरोनाचे दोनच रुग्ण सापडले होते. याआधी पहिल्या रुग्णाला डिश्चार्ज देण्यात आला होता. तर शनिवारी दुसऱ्या रुग्णाची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानं त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे वाचा-लेकरासाठी आई कोरोनाशी लढली, 22 दिवसांच्या मरणयातनेनंतर दिला गोड बाळाला जन्म

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. देशातील काही भाग कोरोनामुक्तच्या दिशेनं वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. गडचिरोलीतील काही भाग, लातूर, अरुणाचल प्रदेश आणि आता मणिपूर ही खरंच दिलासा देणारी बातमी आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 हजार 365 वर पोहोचला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72, 123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे वाचा-दिल्ली हादरली! एकाच कुटुंबातील तब्बल 31 जणांना कोरोनाची लागण, परिसरात खळबळ

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 19, 2020, 8:46 AM IST

ताज्या बातम्या