दिल्लीच्या मँगो फेस्टिवलमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहांची विक्री

दिल्लीच्या मँगो फेस्टिवलमध्ये नरेंद्र मोदी, अमित शहांची विक्री

Mango Festival in Delhi : दिल्लीतील मँगो फेस्टीवलची सध्या जोरात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जुलै : राजधानी दिल्लीमध्ये गुलाबी रंगाचे नरेंद्र मोदी आणि हिरव्या रंगाचे अमित शहा यांची विक्री केली जात आहे. वाचून धक्का बसला ना? पण, होय दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाचे आंबे विकले जात आहेत. दिल्लीतील जनकपुरी येथे दिल्ली हाटमध्ये मँगो फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली सरकार आणि पर्यटन विभागानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. महोत्सवामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा नावाच्या आंब्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर आहे.

500 पेक्षा जास्त प्रकारचे आंबे

दिल्लीतील या मँगो फेस्टीवलमध्ये 500 पेक्षा जास्त जातीचे आंबे आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमधून आंबे आणण्यात आले आहेत. काही उत्पादकांनी आंब्यांना ठेवलेली नावं सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. शिवाय, लोकांना आकर्षित देखील करत आहेत.

स्पर्धेचं आयोजन

या मँगो फेस्टिवलमध्ये पुरूषांसाठी आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. शिवाय, मुलांसाठी देखील विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. 7 जुलै रात्री 9 वाजेपर्यंत हा मँगो फेस्टिवल असणार आहे. मँगो फेस्टिवलला भेट देण्यासाठी येणाऱ्यांना टिळक नगर मेट्रो स्टेशनपासून खास शटल सेवेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे.

VIDEO: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: July 6, 2019, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading