भारतात आंबा आणि चिकू थांबवणार बुलेट ट्रेनचा स्पीड !

आंबा आणि चिकूची शेती देण्यासाठी का आहे विरोध ?

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2018 11:07 AM IST

भारतात आंबा आणि चिकू थांबवणार बुलेट ट्रेनचा स्पीड !

मुंबई, 14 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्याधुनिक बुलेट ट्रेन प्रकल्प गेल्या दिवसांपासून आंबा आणि चिकूमुळे गोत्यात आला आहे. कारण महाराष्ट्रात आंबा आणि चिकूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आपली शेती देण्यास नकार दिला आहे. या विरोधात त्यांना स्थानिक नेत्यांचाही पाठिंवा आहे.

या शेतकऱ्यांच्या विरोधमुळे सरकार जमीन अधिग्रहण करू शकत नाही आहे. जपानच्या मदतीने बनणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे संपूर्ण काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. पण शेतकऱ्यांच्या या विरोधावर सध्यातरी कोणताही मार्ग नसल्याने हा प्रकल्प लांबण्याची शक्यता आहे.

आंबा आणि चिकूची शेती देण्यासाठी का आहे विरोध ?

आंबा आणि चिकूची शेती करणारे शेतकरी ज्या जमिनी सरकारच्या हवाली करण्यासाठी विरोध करतायेत त्या जमिनी 108 किलो मीटर लांब आहेत. हा संपूर्ण बुलेट ट्रेनच्या मार्गाचा 5वा भाग आहे.

हा बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान मोदी यांचं गृह राज्य गुजरात ते सर्वात मोठं शहर अहमदाबादपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबई असा जोडलेला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरकारने शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करण्यासाठी बाजारभावाने 25 टक्के जास्त रकमेची ऑफर केली आहे. त्याचबरोबर पुनर्वसनासाठी जमिनीची किंमत 5 लाख किंवा 50 टक्के (दोन्हीपैकी जे अधिक आहे) च्या रकमेसाठीही योजना केली आहे.

भारतीय रेल्वेच्या दोन वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, जपान आंतरराष्ट्रीय कोऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) पुढील महिन्यांत प्रकल्पाची तपासणी करण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे जर वेळीच बुलेट ट्रेनसाठी जमीन अधिग्रहण केली नाही तर जेआयसीए द्वारे सॉफ्ट लोन मिळण्यात विलंब होईल.

दरम्यान, जपानच्या चिंता दूर करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी टोकियोमध्ये परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर या महिन्यात एक बैठक आयोजित केली होती. कारण बुलेट ट्रेन प्रकल्प 2022मध्ये स्वातंत्र्य 75व्या वर्षी पूर्ण करण्यात यावा अशी भारत सरकारची इच्छा आहे.

पण जर आंबा आणि चिकूच्या शेती असलेल्या शेतकऱ्यांनी जर जमिनी देण्यास विरोध कायम ठेवला तर मात्र मोदींच्या बुलेट ट्रेनची रफ्तार थांबणार इतकं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 14, 2018 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close