Home /News /national /

मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी; गोव्यातील प्रोफेसरवर FIR दाखल

मंगळसुत्राची तुलना कुत्र्याच्या गळ्यातील साखळीशी; गोव्यातील प्रोफेसरवर FIR दाखल

लॉ कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या या प्रोफेसरला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे तिने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : गोव्यातील लॉ कॉलेजमधील (Goa law college) एका असिस्टेंट प्रोफेसर शिल्पा सिंह (Shilpa Singh) यांच्याविरोधात जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आली आहे. ही FIR राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनीच्या गोव्यातील यूनिटमधील राजीव झा यांनी दाखल केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण सिस्टेंट प्रोफेसर शिल्पा सिंहने या वर्षी 21 एप्रिल रोजी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये त्यांनी पितृ सत्ता आणि सिद्धांन्तांना आव्हाहन देत मंगळसूत्राची तुलना साखळीने बांधलेल्या कुत्र्याशी केली होती. पोंडा, साउथ गोव्यात राहणारे राजीव झा यांनी त्यांच्या पोस्टविरोधात गोवा पोलिसात FIR दाखल केली होती. झा यांनी आरोप केला आहे की, शिल्पा सिंह यांनी हिंदू धर्माबाबत सोशल मीडियावर अपमानजनक कमेंट केली आहे आणि धार्मिक भावनांची खिल्ली उडवली आहे. तर शिल्पा सिंह यांनाही पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांना सोशल मीडियावर धमक्यांचे मेसेज येत आहेत. आणि त्यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा दिली जावी. या प्रकरणात शिल्पा सिंह यांच्याविरोधात ABVP नेदेखील कॉलेजमध्ये तक्रार केली होती, ज्यावर कॉलेजने कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला. हे ही वाचा-Laxmii बार ठरला फुसका; सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ ABVP नेही केली तक्रार ABVP ने आरोप केला होता की, प्रोफेसर शिल्पा सिंह एक धर्म विशेषविरोधात समाजात द्वेषयुक्त विचार पसरवत आहे.  ABVP ने मागणी केली होती की, त्यांना तत्काळ हटविण्यात यावं. तक्रारकर्ता राजीव झा म्हणाले की, त्यांना ABVP च्या प्रकरणाबाबत माहिती आहे, मात्र ते यात सामील नाहीत. त्यांनी ही तक्रार वैयक्तिकपणे केली आहे. नॉर्थ  गोवाचे एसपी उत्कृष्ठ प्रसून याबाबत म्हणाले की, तक्रारदाराने प्रोफेसर शिल्पा सिंह आणि राजीव झा यांच्याविरोधात केस दाखल करण्यात आला आहे. शिल्पा सिंह यांच्यावर IPC कलम 295-A (जाणूनबुजून धार्मिक भावना भडकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पोंडामध्ये राहणारे राजीव यांच्यावर IPC च्या सेक्शन 504 (शांति भंग करण्यासाठी अपमानीत करणे), 506 ( धमकी) आणि 509 (महिलेचा अपमान करणे) अंतर्गत केस दाखल केली आहे. एस पी प्रसून म्हणाले की या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रोफेसर शिल्पा सिंह यांनी मागितली माफी आपल्या फेसबुक पोस्टवरुन गोंधळ निर्माण झाल्यानंतर प्रोफेसर शिल्पा सिंह यांनी माफी मागितली आहे. त्यांनी लिहिलं की, माझं विचार चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले. माझ्या पोस्टमुळे ज्या महिलांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची मी दिलगिरी व्यक्त करते. त्यांनी पुढे लिहिलं की, लहानपणापासून मी नेहमी या प्रश्नावर विचार करायचे की, लग्नानंतर माझं मॅरिटल स्टेटसचं सिम्बल केवळ महिलांसाठी का गरजेचं आहे, पुरुषांसाठी का नाही. हे पाहून मी निराश आहे. माझ्याबद्दल चुकीचे विचार पसरवले जात आहे की मी एक 'अधार्मिक' आणि देवाचा द्वेष करणारी नास्तिक आहे. मात्र हे सत्य नाही.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Goa

    पुढील बातम्या