Home /News /national /

नगरसेवक असावा तर असा! पावसामुळे रस्ताभर पाणी; स्वत: मॅनहोलमध्ये उतरुन केली स्वच्छता

नगरसेवक असावा तर असा! पावसामुळे रस्ताभर पाणी; स्वत: मॅनहोलमध्ये उतरुन केली स्वच्छता

अनेक भागात तर निवडणुकींनंतर नगरसेवक आपल्या वॉर्डात फिरकतही नाही. भाजपचे नगरसेवक मनोहर शेट्टी यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे

    बंगळुरु, 25 जून : कर्नाटकच्या मंगळुरु येथे भारतीय जनता पक्षाचा एका नगरसेवक सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. त्याचं छायाचित्रे खूप व्हायरल होत आहेत. वस्तुतः शहरात वादळी पाऊस पडल्यानंतर स्वत: मनोहर शेट्टी गटारात रस्त्यावर पडलेले पाणी काढून टाकण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरले. जेव्हा आपल्या शहरातील रस्त्यावर पाणी साचेल, पूरसदृश परिस्थिती उद्भवेल तर तुम्ही काय करता? आपण आपल्या स्थानिक नगरसेवकांना कॉल करतो. आणि मग नगरसेवक कामगारांना बोलावून गटार साफ करुन घेतो. पण मंगलोरचे भाजप नगरसेवक मनोहर शेट्टी स्वत: मॅनहोलच्या आत गेले. शेट्टी कादरी हे दक्षिण भागातील नगरसेवक आहेत. कुणीतरी त्याचे मॅनहोलमधून बाहेर पडलेले छायाचित्र काढले आणि त्यानंतर हे चित्र व्हायरल झाले आहे. त्यामुळे शेट्टी सेलिब्रिटी बनले आहेत. हे वाचा-खासगी कार्यालये बंद होती म्हणून टळला मोठा अनर्थ, PHOTO तून पाहा मुंबईतील भीषण आग शेट्टी यांच्या मते पावसाच्या पाण्यासाठी बनविलेले नाले कचरा अडकल्यामुळे ओसंडून वाहत होते. रस्त्यावर पाणी वाहत होते, त्यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता, त्याचबरोबर रहदारीही अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यांनी मजुरांना हे काम करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला. पावसाळ्यात गटाराच्या आत जाणे धोकादायक असल्याचे कामगारांनी सांगितले. यानंतर त्यांनी मशीन बसवून पाणी काढण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्नही अपयशी ठरला. हे वाचा-दोन खुनाच्या घटनेनं शिर्डी हादरली, पोलिसांनी शहरात केली मोठी कारवाई शेट्टी म्हणतात- 'मी जेट ऑपरेटरला आत जाऊन कचरा साफ करण्यास सांगितले, जेणेकरून पाइपलाइन साफ ​​होईल. परंतु त्याने तसे करण्यास नकार दिला. कोणीही तयार नव्हते. म्हणूनच मी मॅनहोल साफ करण्याचा विचार केला. मला त्या  मॅनहोलमध्ये प्रवेश करताना पाहून माझ्या पक्षाचे अन्य चार कार्यकर्तेही पुढे आले. मग आम्ही फ्लॅशलाइटच्या मदतीने पाइपलाइन स्वच्छ केली. आम्हाला अर्धा दिवस लागला. पण आत अडकलेला कचरा आम्ही स्वच्छ केला. ज्यामुळे पाईपलाईन साफ ​​झाली आणि उर्वरित भागातून पाणी येऊ लागले. रस्त्यावर साचलेले पाणीही साफ झाले.   संपादक - मीनल गांगुर्डे
    First published:

    Tags: BJP, Bjp corporator

    पुढील बातम्या