१२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच मिळावी यासाठी करणार प्रयत्न- मनेका गांधी

१२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच मिळावी यासाठी करणार प्रयत्न- मनेका गांधी

महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधींनी महत्त्वाची घोषणा केलीये. पॉस्को कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत.

  • Share this:

13 एप्रिल : कठुआमधल्या भयानक बलात्कार आणि खून प्रकरणावर अखेर केंद्र सरकारमधून बोलायला सुरुवात केलीये. महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधींनी महत्त्वाची घोषणा केलीये. पॉस्को कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा त्या प्रयत्न करणार आहेत.

१२ वर्षांखालील मुलं किंवा मुलींवर बलात्कार झाला तर दोषींनी थेट फाशीची तरतूद केली जाणार आहे. सोमवारी त्या कॅबिनेट नोट जारी करणार आहेत. आता मंत्रिमंडळ यावर काय निर्णय घेतं, ते पहावं लागेल. सध्या बलात्कार खटल्यातल्या दोषींना जास्तीत जास्त जन्मठेपेची तरतूद आहे.दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमध्ये फाशी सुनावली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 11:11 AM IST

ताज्या बातम्या