मध्यप्रदेशात पोलिसांचा शेतकऱ्यांवर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशात पोलिसांचा शेतकऱ्यांवर गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडलीये. या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झाले आहे.

  • Share this:

06 जून :  मध्य प्रदेशमध्ये पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना घडलीये. या गोळीबारात 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.

महाराष्ट्रात कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी शेतकरी गेल्या सहादिवसांपासून रस्त्यावर उतरलाय. मध्यप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीसाठी अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू आहेत.

आज सकाळी निदर्शनं सुरू असताना आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रक पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात पाच जण जखमी झाले. या पाचही जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी इतर तीनही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

पण या गोळीबाराबद्दल सरकारची भूमिका वेगळीच आहे. पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेशच नव्हते. त्यांनी तसं केलंही नाही, अशी प्रतिक्रिया मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी दिलीय. पण मग शेतकऱ्यांचा मृत्यू झाला कसा, याचं सरकारकडे उत्तर नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2017 05:45 PM IST

ताज्या बातम्या