मध्य प्रदेश, 31 डिसेंबर : जिल्ह्यात कांद्याच्या भावात दिवसेंदिवस घसरण होत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहे. कांद्याला भाव न मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा हादरा बसला आहे. अशातच एका शेतकऱ्याचा कांद्याला भाव न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना मंदसौर कृषी समितीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भेरूलाल मालवीय (40) हे मंदसौर कृषी समितीमध्ये आपला 27 क्विंटल कांदा विकण्यासाठी घेऊन आले होते. परंतु, कांद्याला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
भेरूलाल मालवीय हे मंदसौर जिल्ह्यातील मल्हारगड तहसीलच्या उजागरिया गावचे रहिवासी होती. त्यांनी आणलेल्या 27 क्विंटल कांद्याला 372 प्रतिक्विटल दराने फक्त 10,045 रुपये मिळाले होते. हाती आलेले पैसे घेऊन ते घरी निघाले होते. परंतु, त्यांना कृषी समितीच्या आवारात ह्रदयविकाराचा झटका आला.
भेरूलाल यांच्यासोबत त्यांचा मुलगा रवी सुद्धा आला होता. रवीच्या समोर त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भेरूलाल यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारने काही मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
कांद्याचा भाव हा प्रति 50 रुपये क्विंटल ते 800 रुपये प्रति क्विंटल विकला जात आहे. पण कांद्याला सरासरी फक्त 300 ते 400 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. या भावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पूर्ण खर्चही निघत नाही.
=================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer died, Heart attack, Mandsaur, Onion farmer, Priceonion