मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्टेजवर हनुमानाची भूमिका साकारत असतानाच मृत्यूने गाठलं, हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

स्टेजवर हनुमानाची भूमिका साकारत असतानाच मृत्यूने गाठलं, हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO

हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना आणि या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Man Died on Stage)

हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना आणि या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Man Died on Stage)

हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना आणि या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (Man Died on Stage)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 03 ऑक्टोबर  : मृत्यू कधी, कुठे आणि कोणाला गाठेल हे सांगता येत नाही. अनेकदा माणसाला याची कल्पनाही नसते की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे. उत्तर प्रदेशातील एका घटनेत असंच झालं. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात महाबली हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू झाला. ही घटना धाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलेमपूर गावात घडली. ही संपूर्ण घटना आणि या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सर्व विसरून बेधुंद होऊन नाचला, गरब्याच्या आनंदात ठाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा गेला जीव; कुटुंबावर शोककळा

जागरण सुरू असताना लंका दहनाच्या कार्यक्रमादरम्यान नाचत असताना कलाकार रामस्वरूप अचानक स्टेजवरुन खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी शांतता पसरली होती. कलाकाराच्या पत्नीने हे सगळं डोळ्यासमोर पाहिलं अन् तिथेच मोठमोठ्याने रडू लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नवरात्रीनिमित्त सलेमपूरमध्ये देवीच्या जागरणाचा कार्यक्रम सुरू होता. शनिवारी रात्री पंडालमध्ये रामलीलेचं आयोजन करण्यात आलं होतं. गावातील 50 वर्षीय रामस्वरूप महाबली हनुमानाची भूमिका करत होते. लंकेला आग लावण्यासाठी त्यांची शेपटी पेटवली गेली. मात्र, एका मिनिटानंतर त्यांना अचानक झटका आला. यात ते स्टेजवरुन डोक्यावर पडले. लोकांनी त्यांना उचलण्यासाठी धाव घेतली आणि रुग्णालयात नेलं मात्र तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता.

Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू

हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेली मृताची पत्नी अनुसया आणि शेकडो लोकांनी डोळ्यासमोर या व्यक्तीचा मृत्यू पाहिला. गावप्रमुख गुलाब यांनी सांगितलं की, रामस्वरूप फेरी मारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. पंडालमध्ये त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. पोलिसांना न सांगता कुटुंबीयांनी रविवारी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, कलाकाराच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

First published:

Tags: Shocking video viral