साध्वी प्रज्ञाच्या त्या वक्तव्यावर सर्जिकल स्ट्राईकचे नायक काय म्हणाले?

साध्वी प्रज्ञाच्या त्या वक्तव्यावर सर्जिकल स्ट्राईकचे नायक काय म्हणाले?

लेफ्टनंट जनरल दिपेंद्र सिंग हुड्डा यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल : 'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझा शाप भोवला, असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलं होतं. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच सव्वा महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले असं विधान साध्वी यांनी केलं होतं. दरम्यान, या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.

पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून त्यांच्या उमेदवारीचं सनमर्थन करण्यात आलं होतं. त्यांच्यावर टीकेची झोड उडत असताना सर्जिकल स्ट्राईकचे नायक लेफ्टनंट जनरल दिपेंद्र सिंग हुड्डा यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शहीदांबद्दल अशा गोष्टी ऐकल्यानंतर दु:ख होतं. मग शहीद हा पोलिस दलातील असो अथवा सैन्यातील. शहीदांच्या सन्मान केला गेला पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य दुर्दैवी आहे. असं हुड्डा यांनी म्हटलं आहे.

2016मध्ये सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लेफ्टनंट जनरल हुड्डा यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. साध्वी यांनी केलेल्या विधानावरू देशातून देखील त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मुंबईमध्ये 2008मध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले होते.

लाव रे तो व्हिडिओ..मुंबईतही घुमणार राज ठाकरे यांचा आवाज, सभेला अखेर मिळाली परवानगी

काँग्रेसची टीका

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद अधिकाऱ्यांबद्दल केलेलं वक्तव्य हे अतिशय संतापजनक असून विष पसरविणारं आहे. असं विषारी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला आपल्या नावापुढे साध्वी हा शब्द लावण्याचा अधिकार नाही असं मत काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी व्यक्त केलं होतं. हा शहीदांचा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

पंकजांची जीभ घसरली.. म्हणाल्या, राहुल गांधीला एखाद्या बॉम्बला बांधून पाठवायचं होतं

पुन्हा वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीतील भोपाळ येथील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून नवीन वाद निर्माण केला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी शनिवारी (20 एप्रिल) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'निश्चित स्वरूपात राम मंदिर बांधण्यात येणार असून हे एक भव्य मंदिर असेल.' यानंतर मंदिर उभारण्यासाठीच्या वेळमर्यादेबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रज्ञा यांनी सांगितले की, 'आम्ही मंदिर बांधणार. शेवटी (बाबरी मस्जिद)ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी आम्हीच तेथे गेलो होतो'.

या विधानाची निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वींना नोटीस बजावण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकारी वी.एल. कांता राव यांनीही सर्वच राजकीय नेत्यांना चेतावणी दिली आहे.

VIDEO : साताऱ्यातील आजींनी दिल्या शिव्या, म्हणाल्या कशाला पाहिजे सरकार?

First published: April 21, 2019, 5:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading