शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला 8 वर्षांनी अटक

शरद पवारांवर हल्ला करणाऱ्याला 8 वर्षांनी अटक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केंद्रीय कृषी मंत्री असताना दिल्लीत एका माथेफिरु तरुणाने हल्ला केला होता.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 2011 मध्ये एका माथेफिरू तरुणाने गर्दीतून पुढे येत हल्ला केला होता. अरविंदर सिंग नावाच्या तरुणाला आठ वर्षांनी दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना दिल्लीतील एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथून बाहेर निघताना अरविंदरने अचानक हल्ला केला होता.

शरद पवारांवर हल्ला केल्यानंतर अरविंदर फरार झाला होता. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने 2014 मध्ये त्याला गुन्हेगार घोषित केलं होतं. आता अरविंदरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्लीत ट्रान्सपोर्टर म्हणून काम करणाऱ्या अरविंदर सिंगने आपण महागाईमुळे आणि भ्रष्टाचाराने वैतागलो आहे आणि योजना करून कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला करायला आलो होतो असं सांगितलं होतं. याशिवाय त्याच्याकडे असलेलं धारदार शस्त्रही उपसलं होतं. पण सुरक्षा रक्षकांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याला दूर ढकललं होतं.

शरद पवार यांनी त्यावेळी या प्रकरणाला जास्त महत्व देण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. तसेच पत्रकारांमध्ये धक्काबुक्की होत आहे असं पहिल्यांदा वाटलं होतं. तसेच त्यावेळी आपण ठिक असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं होतं.

त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी हा प्रकार म्हणजे पटकन प्रसिद्धी मिळवण्याचा मार्ग असल्याचं सांगत निषेध केला होता. तसेच या बाबीला जास्त महत्व देऊ नये असंही म्हटलं होतं.

VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

Published by: Suraj Yadav
First published: November 13, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या