Home /News /national /

Shocking! सर्पदशांने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणालाही चावला साप, रुग्णालयात मृत्यू

Shocking! सर्पदशांने मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या तरुणालाही चावला साप, रुग्णालयात मृत्यू

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सापाने दंश केल्याने भावाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी गेलेल्या व्यक्तीलाही सापाने दंश केला. यात त्याचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    पाटणा 05 ऑगस्ट : एक अतिशय धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यात सर्पदंशाने दोन भावांचा मृत्यू झाला आहे. सापाने दंश केल्याने भावाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी गेलेल्या व्यक्तीलाही सापाने दंश केला. यात त्याचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झोपेत असताना सापाने त्यांना दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील बलरामपूर येथे ही घटना घडली असून दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मुलांना विश्वासात घ्या! चंद्रपुरमध्ये शाळकरी मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव, Shocking कारण समोर सर्कल अधिकारी राधे रमन सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय अरविंद मिश्रा यांचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. त्यांचा भाऊ गोविंद मिश्रा (वय 22) अंत्यविधीसाठी गावात आला होता. मात्र, भावाच्या अंत्यविधीसाठी आलेला असताना मंगळवारी त्यालाही सापाने दंश केला आणि त्याचंही निधन झालं. भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या गोविंदला झोपेत असतानाच सापाने दंश केला. गोविंदसोबत त्यांचा एक नातेवाईकदेखील त्या खोलीत झोपला होता. त्यालाही सापाने दंश केला, अशी माहिती रमन सिंग यांनी दिली आहे. गोविंदला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे त्याची प्रकृती गंभीर होती असं अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. सावधान! घरातील पेस्ट कंट्रोलने घेतला 6 वर्षीय मुलीचा जीव; आई-वडीलही रुग्णालयात दाखल वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलाश शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, मदतीचं आश्वासन दिलं आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र, सापाच्या दंशाने एकाच घरातील दोघांचं निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Snake

    पुढील बातम्या