मतदान केलं म्हणून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

मतदान केलं म्हणून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 03:18 PM IST

मतदान केलं म्हणून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

कुलगाम, 21 मे : देशात सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता उत्सुकता आहे ती निकालाची. पण, मतदान केलं म्हणून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना जम्मू - काश्मीरमध्ये घडली आहे. मोहम्मद जमाल असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तिचं नाव आहे. कुलगाममधील जंगलपोरा भागात ही घटना घडली आहे. मोहम्मद जमाल हे पीडीपीचे कार्यकर्ते होते. दहशतवाद्यांनी मतदान करू नका अशी धमकी दिली होती. पण त्यानंतर देखील मोहम्मद जमाल यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. मोहम्मद जमाल यांच्या कुटुंबातील पाच तर इतर दोघे असं मिळून 7 जणांनी यावेळी मतदान केलं. पण, धमकीला न जुमानल्यानं दहशतवाद्यांनी मोहम्मद जमाल यांनी पाच गोळ्या झाडून हत्या केली आहे.

29 एप्रिल रोजी मोहम्मद जमाल यांच्या गावी मतदान पार पडलं. गावातील 500 घरांपैकी केवळ 7 जणांनी मतदान केलं. यामध्ये 5 जण हे मोहम्मद जमाल यांच्या घरातील होते.


नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा सट्टा बाजार बंद; जाणून घ्या कारण

तब्येत ठिक नसताना केलं मतदान

Loading...

मोहम्मद जमाल यांची तब्येत ठिक नव्हती. त्यानंतर देखील त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान करून येत असताना दहशतवाद्यांनी मोहम्मद जमाल यांच्या पोटात 2, दोन हातांवर 2 आणि नाकावर एक गोळी झाडली. जमाल यांचे नातेवाईक अहमद भट यांनी याबाबतची माहिती दिली. 27 एप्रिल रोजी झालेली घटना 17 एप्रिल रोजी समोर आली होती. मतदान केल्यानंतर होणाऱ्या परिणामांची मोहम्मद जमाल यांना कल्पना होती. त्यानंतर देखील त्यांनी मतदान केल्याचं बोललं जात आहे. दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीनंतर काश्मीरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरलेली दिसून आली. शिवाय, मतदानावेळी ग्रेनेड हल्ला देखील झाला होता.


VIDEO: उद्धव ठाकरेंची प्रताप सरनाईकांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...