संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न, एकाला अटक

संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न, एकाला अटक

संसदेवरच्या हल्ल्यानंतर सुरक्षा अधिकारी कुठलीही त्रुटी राहू नयेत यासाठी कायम दक्ष असतात असं असतानाही आजच्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 09 डिसेंबर : राजधानी दिल्लीत संसदेचं अधिवेश सुरू आहे. संसद भवन हे सर्वाधिक सुरक्षा असलेलं स्थान आहे. संसदेवरच्या हल्ल्यानंतर तर ही सुरक्षा सर्वात जास्त कडक करण्यात आलीय. सुरक्षेचे अनेक स्तर असतानाही आज संसदेत एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. संसदेवरच्या हल्ल्यानंतर सुरक्षा अधिकारी कुठलीही त्रुटी राहू नयेत यासाठी कायम दक्ष असतात असं असतानाही आजच्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आता त्या व्यक्तिची कसून चौकशी करणार असून त्यामागची त्याची भावना काय होती हेही समजून घेणार आहे. संसदेचं अधिवेशन सुरु असताना देशभरातून लोकं दिल्लीत येत असतात. संसद भवनात खासदारांसोबत त्यांचे कार्यकर्तेही येत असतात. संसदेत प्रवेश करण्याचे नियम आहेत.

ते अतिशय कडक असल्याने अनेकांना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे अनेक जण सुरक्षा जवानांशी वाद घालतात. अशाच प्रयत्नांमधून कुणी घुसण्याचा प्रयत्न केला काय याचीही माहिती आता घेतली जात आहे. लोकसभेत आज नागरिकत्व सुधारणा विधेयकावर चर्चा होती त्यामुळे राजकीय वातावरण वादळी होतं. सुरक्षा यंत्रणा अधिक सावधगीरी बाळगत आहेत.

शरद पवारानंतर एकनाथ खडसे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार

संसदेत वादळी चर्चा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून लोकसभेत आज वादळी चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी हे विधेयक लोकसभेत सादर केलं. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने 293 मते तर विरुद्ध 82 मते पडली. महाराष्ट्रात युती तोडल्यानंतर केंद्रात सेनेच्या एकमेव मंत्र्यांने राजीनामा दिल्यानंतर या विधेयकावेळी सेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेने या विधेयकावरून अमित शहांवर निशाणा साधलाय. नागरिकत्व देणाऱ्या निर्वासितांना मतदानाचा हक्क देऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यावर भाजपने जोरदार निशाणा साधलाय. भाजपचे नेते आशीष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतलाय. पण नंतर ते ट्वीट डिलीट केलंय त्यावरून चर्चा सुरू झालीय.

पंकजा मुंडेंच्या पराभवात भाजप नेत्यांचा हात? काय म्हणाले विनायक मेटे

या विधेयकाला शिवसेनेने सशर्त पाठिंबा देत अमित शहा आणि त्यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केलीय. ज्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येणार आहे त्यांना मतदानाचा अधिकार मात्र देऊ नका अशी भूमिका शिवसेनेने घेतलीय. त्यावर आशीष शेलार म्हणाले, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम हिंदुंसाठी आपला मतदानाचा हक्क गमावला होता. मात्र बाळासाहेबांची शिवसेना आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करत आहे. इथे आलेल्या हिंदुंना मतदानाचा अधिकार नको? अशी त्यांची भूमिका आहे. सत्तेसाठी पाहा कशी कमाल, काँग्रेसचे हमाल, दे धमाल असं ट्वीट शेलार यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 07:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading