वाघाला कोरोना झाल्यानं शेतकरी घाबरला, शेळ्यांची 'अशी' घेतोय काळजी

वाघाला कोरोना झाल्यानं शेतकरी घाबरला, शेळ्यांची 'अशी' घेतोय काळजी

हाँगकाँगमध्ये पाळीव कुत्र्याला आणि न्यूयॉर्कमध्ये एका वाघाला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.

  • Share this:

हैदराबाद, 09 एप्रिल : देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारतात 5734 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 166 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण जनावरांनाही झाल्याच्या काही बातम्या आल्या आहेत. यात पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये पाळीव कुत्र्याला आणि न्यूयॉर्कमध्ये एका वाघाला कोरोना झाल्याचं समजलं होतं. त्यामुळे घाबरलेल्या एका व्यक्तीनं शेळ्यांनाच मास्क लावला आहे.

तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यात राहणाऱ्या ए वेंकटेश्वर यांच्याकडे 20 शेळ्या आहेत. त्यांनी या सर्व शेळ्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांच्या तोंडावर मास्क लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाजवळ शेतीसाठी पुरेशी जमीन नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळ्यांवरच चालतो. म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी मास्क लावले असल्याचं वेंकटेश्वर राव यांनी सांगितलं.

वेंकटेश्वर राव म्हणाले की, वाघाच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समजल्यानंतर शेळ्यांच्या तोंडाला मास्क लावले. मीसुद्धा तोंडाला मास्क लावत आहे. जेव्हा शेळ्यांना जंगलात चरायला घेऊन जातात तेव्हा मास्क लावलेला असतो.

हे वाचा : महिला पोलिसाचं ममत्व आलं धावून, महिलेची जिप्सीमध्ये केली प्रसूती

तेलंगणात आतापर्यंत कोरोनाची 427 प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये 35 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात देशामध्ये कोरोनाचे 549 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा : कोरोना नाही तरी अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांनी दिला नकार, मृतदेह नाल्यात केला दफन

First published: April 9, 2020, 6:14 PM IST

ताज्या बातम्या