काळवीट शिकार प्रकरण: 'सलमानला कोर्ट नाही, मीच शिक्षा देणार'

काळवीट शिकार प्रकरण: 'सलमानला कोर्ट नाही, मीच शिक्षा देणार'

सोशल मीडियावरून सलमान खान याला धमकी देणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

  • Share this:

जोधपूर, 03 ऑक्टोबर: काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी सोशल मीडिया(Social Media)वरून एका पोस्ट द्वारे देण्यात आली होती. धमकीची पोस्ट व्हायरल(Post Viral)झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपीस अटक केली. धक्कादायक म्हणजे ज्याने सलमानला धमकी दिली त्याला पोलिसांनी एक गाडी चोरी करताना पकडले होते. चौकशी दरम्यान हा खुलासा झाला की सलमान खान याला त्यानेच धमकी दिली आहे. आरोपीचे नाव जॅकी बिश्नोई असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकीची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये सलमान खानला त्याच्या गुन्ह्यांसाठी न्यायालय कशाला शिक्षा देईल. मीच त्याचा जीव घेऊन आणि शिक्षा देईन, असे म्हटले होते. जॅकी बिश्नोईची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. काळवीट शिकार प्रकरणात सलमान आरोपी आहे. बिश्नोईने याच प्रकरणी सलमानला धमकी दिली होती. पोलिसांच्या चौकशीत बिश्नोईने ही धमकी केवळ प्रसिद्धीसाठी केल्याचे सांगितले.

सलमानला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. हे दोघेही एका आलिशान गाडीत बसले होते. चौकशी दरम्यान ही गाडी चोरीची असल्याचे लक्षात आले. तसेच दोघे अंमली पदार्थाची तस्करी करत होते. या दोघांपैकी एक जण गाड्यांची चोरी करत होता. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर सलमानला धमकी देणारा जॅकी असल्याचे समोर आले.

वरळीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Published by: Akshay Shitole
First published: October 3, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading