पुरुष बनून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करायची महिला, पतीकडे चौकशी करताच त्याने...

पुरुष बनून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करायची महिला, पतीकडे चौकशी करताच त्याने...

अल्पवयीन मुलीने ज्या व्यक्तीच्या नावाने तक्रार केली होती त्याची चौकशी करण्यासाठी पोलिस पोहोचताच त्यांना धक्का बसला.

  • Share this:

विजयवाडा, 09 नोव्हेंबर : पुरुष बनून एक महिला अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्याचा धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशात समोर आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी महिलेच्या पतीकडे पोलिस पोहचले. तेव्हा महिलेच्या पतीने तीन मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या पत्नीवर सेक्स टॉयचा वापर करून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असतानाच तिच्या पतीने तीन मजली इमारतीवरून उडी मारली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकासम जिल्ह्यातील एका 17 वर्षीय मुलीने जिल्हाधिकारी कार्यालयात कृष्ण किशोन रेड्डी नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक सिद्धार्थ कौशल यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलं. कृष्ण किशोर प्रत्यक्षात पुरुष नाही तर महिला आहे.तिने आपले केस लहान कापले होते आणि पुरुषांचा वेष करून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होती.

पोलिसांनी या प्रकरणी एका घरी छापा टाकला. तेव्हा पोलिसांनी सेक्स टॉयजने भरलेली बॅग ताब्यात घेतली. दरम्यान आरोपी महिलेच्या पतीकडे पोलिस शुक्रवारी चौकशी करत होते. तेव्हा तो जिन्यावरून धावत तिसऱ्या मजल्यावर गेला आणि उडी मारली. त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. मृत झालेली व्यक्ती आरोपी महिलेचा तिसरा पती होती.

याप्रकरणी आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिस उपअधीक्षक बी रवि चंद्रा यांनी सांगितलं की, आरोपी महिला अल्पवयीन मुलींसोबत मैत्री करायची. त्यानंतर आमिष दाखवून पुन्हा त्यांच्याशी जबरदस्तीने संबंध ठेवण्यासाठी मजबूर करत असेल. पोलिसांनी 32 वर्षीय आरोपी महिलेला पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

VIDEO : अयोध्या प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर गडकरींची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: childwomen
First Published: Nov 9, 2019 01:59 PM IST

ताज्या बातम्या