मराठी बातम्या /बातम्या /देश /

उपचाराअभावी गमावला आवडता श्वान; हळहळलेल्या तरुणाने भरपूर सुविधांसह सुरु केलं पशुवैद्यकीय रुग्णालय

उपचाराअभावी गमावला आवडता श्वान; हळहळलेल्या तरुणाने भरपूर सुविधांसह सुरु केलं पशुवैद्यकीय रुग्णालय

शैवल देसाईने बेस्टबड्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले (Vet Hospital For Pets). यात पाळीव प्राण्यांवर विना-नफा सर्व उपचार केले जातात

शैवल देसाईने बेस्टबड्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले (Vet Hospital For Pets). यात पाळीव प्राण्यांवर विना-नफा सर्व उपचार केले जातात

शैवल देसाईने बेस्टबड्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले (Vet Hospital For Pets). यात पाळीव प्राण्यांवर विना-नफा सर्व उपचार केले जातात

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 नोव्हेंबर : एक टेक कंपनी चालवणारा २९ वर्षीय मेकॅनिकल इंजिनियर शैवल देसाई (Shaival Desai) 27 ऑक्टोबर 2020 चा तो दिवस कधीही विसरू शकणार नाही, जेव्हा त्यानं आपला अतिशय खास दोस्त गमावला. या दिवशी त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याच्या पिल्लाने अखेरचा श्वास घेतला. पशुवैद्यकांनी त्याला आश्वासन दिले होते की ते त्याला वाचवतील. मात्र हे आश्वासन खोटे ठरले. त्यानं जवळपास शहरातील प्रत्येक पशुवैद्यकाकडे आपल्या कुत्र्याला नेलं मात्र तरीही त्याला वाचवू शकला नाही.

या श्वानाला असलेल्या पोटाच्या आजाराचे उशिराने निदान झाल्यानं त्याला हे पिल्लू गमवावे लागले. आता त्याने प्राण्यांसाठी एक पूर्ण सुसज्ज हाय-टेक हॉस्पिटल बांधलं आहे (Fully Equipped hi-tech Hospital for Pets). जेणेकरून आपल्या पाळीव प्राण्याला गमवून त्यानं जे दुःख सहन केलं ते इतर कोणाला सहन करावं लागू नये.

पाळीव प्राण्यांसाठी हॉस्पिटल सुरू करावं असं वाटलं. मात्र, याच्या उभारणीसाठी थोडा वेळ लागला. मात्र अखेर त्याने बेस्टबड्स मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले (Vet Hospital For Pets). यात पाळीव प्राण्यांवर विना-नफा सर्व उपचार केले जातात. देसाई यांची ही खास सुविधा त्यांच्या मनाच्या अगदी जवळ आहे. ते म्हणाले, पुरेशा उपचारांअभावी कोणालाही आपला चांगला मित्र गमावावा लागणार नाही, यासाठी मी हे रुग्णालय सुरू केलं. हे हॉस्पिटल माझ्या बडीला समर्पित आहे आणि म्हणून त्याला बेस्टबड्स हे नाव आहे.

सध्या या रुग्णालयात डीआर एक्स-रे रूम आहे जी सर्व अँगलने एक्स-रे काढते, दंत केंद्र, "V" ऑपरेटिंग टेबल असलेली एक लहान शस्त्रक्रिया खोली, जी शस्त्रक्रियेदरम्यान पाळीव प्राण्याचे शरीर उबदार ठेवण्यास मदत करते आणि ऍनेस्थेसिया गॅस बाष्पीभवन, अशा सुविधा उपलब्ध आहे. याठिकाणी कुत्र्यांसाठी व्हेंटिलेटर देखील आहे. हे गुजरातमध्ये कुत्र्यांसाठी असलेलं पहिलं व्हेंटिलेटर आहे, असे देसाई यांनी मिररला सांगितलं. बहुतेक पाळीव प्राणी हाय ऍनेस्थेसियामुळे मरतात. जरी जगण्याची शक्यता 95% असली तरी, पशुवैद्य म्हणतात की ती 50% आहे. हे जास्त प्रमाणात ऍनेस्थेसियामुळे होते. आमच्याकडे असलेली उपकरणे पाळीव प्राणी टिकून राहतील अशा पातळीवर गॅसचे नियमन करतात, असे देसाई म्हणाले.

बेस्टबड्स रुग्णालयात सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांवर उपचार केले जातात. यात कुत्रा, मांजर, पक्षी, कासव, ससा अशा प्राण्यांचाही समावेश आहे. प्राण्यांच्या उपचारासाठी हे रुग्णालय 50 टक्क्यांपर्यंतची आर्थिक मदतही करणार आहे. या रुग्णालयाचे डॉ कृबल पटेल हे पशुवैद्यकीय शस्त्रक्रिया आणि रेडिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि डॉ दिव्यस केलावाला यांनी पशुवैद्यकीय शस्त्रक्रियेमध्ये पीएचडी केलेली आहे.

First published:

Tags: Owner of dog, Pet animal, Private hospitals