Home /News /national /

प्रेमप्रकणातून धक्कादायक हत्या! दोन बायकांच्या मदतीने धारदार शस्त्रानं गुप्तांग कापून शेजाऱ्याला संपवलं

प्रेमप्रकणातून धक्कादायक हत्या! दोन बायकांच्या मदतीने धारदार शस्त्रानं गुप्तांग कापून शेजाऱ्याला संपवलं

हत्येनंतर घटनास्थळी लोकांनी केलेली गर्दी

हत्येनंतर घटनास्थळी लोकांनी केलेली गर्दी

आरोपी व्यक्तीनं आपल्या दोन बायकांच्या मदतीनं शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचं गुप्तांग कापलं. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार करत त्याची हत्या केली आहे.

    गोपालगंज, 04 जानेवारी: प्रेम प्रकरणातून 55 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीने आपल्या दोन बायकांच्या मदतीने अत्यंत क्रूरपणे ही हत्या केल्याचं उघड झालं आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या तिघांनी मिळून या इसमाचं आधी गुप्तांग कापलं आणि मग धारदार वार करून ठार केलं. ही घटना बिहारमधील गोपालगंज येथील आहे. संबंधित मृत व्यक्तीचं नाव बैजनाथ चौधरी असून त्याचं वय 55 वर्षे आहे. या व्यक्तीचं शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळं संतापाच्या भरात संबंधित महिलेच्या पतीनं बैजनाथ चौधरी यांची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत बैजनाथ चौधरी यांना तीन मुलं आणि पाच मुलीं अशी एकूण 8 मुलं आहेत. यातील दोन मुली सोडून उर्वरित सर्व मुलांची लग्न झाली आहेत. धारदार शस्त्राने गुप्तांग कापलं या हत्येमागील मुख्य कारण प्रेमसंबंध असल्याचं म्हटलं जात आहे. असा आरोप केला जात आहे की, बैजनाथ चौधरी यांचं घराबाजूच्या एका महिलेबरोबर अवैध संबंध होते. याप्रकरणी काही पुरावेही समोर आले आहेत, जे दोघांत अवैध संबंध असल्याची पुष्टी करतात. असं म्हटलं जात आहे की, आरोपी शेजार्‍याने अनेकदा बैजनाथला याबाबत चेतावणी दिली होती. असं असूनही बैजनाथ चौधरी आरोपीच्या दुसर्‍या पत्नीच्या संपर्कात राहिला. शनिवारी रात्री बैजनाथ आरोपी शिव कुमार चौधरी यांच्या घरात घुसला होता. त्यानंतर शिव कुमारने आपल्या दोन्ही पत्नीच्या मदतीने मृत व्यक्तीचं गुप्तांग कापलं आणि त्यानंतर त्याची हत्या केली. जमीनीच्या वादातून हत्या झाल्याचा आरोप या घटनेनंतर, मृत व्यक्तीच्या पत्नीनं ही हत्या जमीनीच्या वादातून झाली असल्याचा आरोप केला आहे. या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गोपाळगंज येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. जादोपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख मिथिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितलं की, मृताची पत्नी शांती देवीनं तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी पाच जणांवर आरोप केले आहेत. ही हत्या जमीनीच्या वादातून झाली असल्याचं तिनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं पोलिसांनी  शेजारी शिवकुमार चौधरी, त्यांच्या दोन पत्नी फूलमती देवी आणि किरण देवी यांना अटक केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime

    पुढील बातम्या