धक्कादायक; पतीने पत्नीचे नग्न फोटो तिच्याच वडिलांना आणि भावाला पाठवले!

धक्कादायक; पतीने पत्नीचे नग्न फोटो तिच्याच वडिलांना आणि भावाला पाठवले!

पतीने पत्नीचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपद्वारे चक्क तिच्या भावाला आणि वडिलांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे उघडकीस आला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 15 ऑगस्ट: पतीने पत्नीचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपद्वारे चक्क तिच्या भावाला आणि वडिलांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे उघडकीस आला आहे. यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

DNA वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार संबंधित पतीने पत्नीचे 7-8 नग्न फोटो तिच्या वडिलांना आणि भावाला पाठवले होते. हे फोटो पाहिल्यानंतर पीडित महिलेल्या भावाला धक्काच बसला. त्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी पतीला अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 13 एप्रिल 2019 रोजी पीडित महिलेल्या भावाला पाठवले. या फोटोसोबत त्याने मी काय करू शकतो याचे हे केवळ उदाहरण असल्याची धमकी देखील दिली होती. त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू असे देखील म्हटलेहोते. त्यानंतर आरोपीने 7 जुलै 2019 रोजी पीडित महिलेल्या वडिलांना देखील फोटो देखील पाठवले. स्वत:च्या बहिणीचे फोटो पाहिल्यानंतर भावाने सोलो हायकोर्ट पोलिसांकडे आरोपी परमारविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

आरोपी परमार यांनी पीडित महिलेशी गेल्या वर्षी विवाह केला होता. लग्नानंतर परमारचे अन्य महिलेशी संबंध असल्याचे समजले. हा प्रकार पीडित महिलेने सासू सासऱ्यांचा कानावर घातला. पण त्यांनी पीडित महिलेची मदत करण्याऐवजी मुलाची बाजू घेतली. दरम्यान आरोपीकडून महिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या प्रकाराला कंटाळून महिलेने पतीचे घर सोडले आणि वडिलांच्या सोबत राहू लागली. या महिलेने काही महिन्यांपूर्वी पतीच्या विरुद्ध पोलिसात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

SPECIAL REPORT : ब्रम्हनाळमध्ये जिथे बोट उलटली तिथे सापडले लाखो रुपयांचे हार-दागिने!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या