Home /News /national /

Shocking! पत्नीने हातातल्या बांगड्या फोडल्या, अंत्यसंस्कार केले; 24 तासानंतर जिवंत घरी परतला पती

Shocking! पत्नीने हातातल्या बांगड्या फोडल्या, अंत्यसंस्कार केले; 24 तासानंतर जिवंत घरी परतला पती

मुलाने त्याचं मुंडण करून वडिलांवर अंतिम संस्कार केले. बायकोने बांगड्या फोडून भांगातील कुंकू पुसलं. कुटुंबातील सदस्य अस्थिकलश घेण्यासाठी स्मशानभूमीत जात असताना अचानक ती व्यक्ती जिवंत परतली.

    भोपाळ 07 मे : ग्वाल्हेरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. यात 24 तासांपूर्वी मृत म्हणून अंत्यसंस्कार केलेली व्यक्ती जिवंत घरी परतली. हे पाहून घरातील लोकांना धक्काच बसला. त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, मात्र यावेळी ते आनंदाचे होते (Man Returned Home Alive after his Funeral). मुलाने त्याचं मुंडण करून वडिलांवर अंतिम संस्कार केले. बायकोने बांगड्या फोडून भांगातील कुंकू पुसलं. कुटुंबातील सदस्य अस्थिकलश घेण्यासाठी स्मशानभूमीत जात असताना अचानक ती व्यक्ती जिवंत परतली. कुटुंबात आनंदाची लाट उसळली. पण मग अंत्यसंस्कार नक्की कोणावर करण्यात आले, हे पोलिसांनाही समजेना. वरमाळेचा कार्यक्रम झाला अन् फेरे सुरु होतानाच नवरीला समजलं नवरदेवाचं सत्य, मंडपातच मोडलं लग्न इंदरगंजच्या नौगाजा रोड भागात राहणारा रोहित कुशवाह 10 दिवसांपूर्वी घरातून मंदिरात जाण्यासाठी निघाला होता. पण परत आला नाही. दोन दिवसांपूर्वी महाराजा बाडा उद्यानात एका व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी रोहितच्या कुटुंबीयांना माहिती दिली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. याठिकाणी एक मृतदेह ठेवलेला होता, ज्याचा चेहरा पूर्णपणे खराब झालेला होता. तसंच एक हात आणि पायाने हा व्यक्ती अपंग होता. रोहितही एका हाताने आणि पायाने अपंग आहे. कुटुंबीयांनी यावरुन हा रोहित असल्याचं म्हटलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र नियतीच्या पुढे कोणी नाही, असा विचार करून कुटुंबीयांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. शुक्रवारी रोहितचे कुटुंबीय मुक्तीधाम येथे अस्थी जमा करण्यासाठी जात होते. त्याचवेळी रोहित जिवंत असून गिरवई येथे सासरच्या घरी पोहोचल्याची बातमी मिळाली. घटनेची माहिती मिळताच घरातील सदस्यांनी लगेचच तिकडे धाव घेतली. रोहितला तिथे जिवंत पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गिरवई येथील बेपुरा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्याचं रोहितनं सांगितलं. यानंतर तो तिथेच थांबला होता. अजबच! फक्त 180 रुपयांच्या चप्पल चोरीमुळे पोलीसही चिंतेत; तक्रार येताच सुरू केला तपास कारण... या घटनेनंतर रोहितचे कुटुंबीय आनंदात असले तरी पोलीस मात्र अडचणीत आले आहेत. रोहित जिवंत आहे, तर ही मेलेली व्यक्ती कोण, कोणावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्वाल्हेरचे एसएसपी अमित सांघी सांगतात की, मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यापूर्वी बोटांचे ठसे घेण्यात आले. आता बोटांच्या ठशांच्या आधारे मृताची ओळख पटवली जाईल. मृताचे कपडे आणि फोटो पोलिसांकडे आहेत. पुढील तपास सुरू आहे
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dead body, Shocking news

    पुढील बातम्या