News18 Lokmat

मीडिया प्रोफेशनल असल्याचं भासवून 21 महिलांना फसवणारा भामटा जेरबंद

दिसायला देखणा, भाषेवर प्रभुत्व असलेल्या अभिषेकने अशी खोटी माहिती देऊन अनेक महिलांकडचे पैसे लंपास केले.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 08:27 PM IST

मीडिया प्रोफेशनल असल्याचं भासवून 21 महिलांना फसवणारा भामटा जेरबंद

नवी दिल्ली 25 डिसेंबर : मीडिया हाऊसमध्ये मोठ्या पदावर आहे असं सांगून एका भामट्याने एक नव्हे दोन नव्हे तर चक्क 21 महिलांना गंडा घातला. सोशल मीडिया आणि मॅट्रेमोनियल साईट्सवरून त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचे पैसे दागिने लंपास केले. मात्र अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये पठवलं.


दिल्ली पोलिसांनी जेव्हा त्या भावट्याची चौकशी केली तेव्हा अनक सुरस कथा समोर आल्या. अभिषेक वसिष्ठ असं त्या 32 वर्षीय भामट्याचं नाव आहे. बनावट ओळखपत्र बनवून त्याने विविध खोटी नावं  धारण केली तसच मॅट्रेमोनियल साईट्सवर आणि फेसबुकवर अनेक प्रोफाईल्स तयार केली होती. आपण चांगल्या माध्यम समुहात आहोत. 25 लाखांचं पॅकेज आहे असं तो सांगत असे.


दिसायला देखणा, भाषेवर प्रभुत्व असलेल्या अभिषेकने अशी खोटी माहिती देऊन अनेक महिलांकडचे पैसे लंपास केले. दिल्लीतल्या एका मुलीशी त्यानं लग्न केलं आणि आठ दिवस सोबत राहिल्यानंतर तो त्या मुलीचे दागिने आणि पैसे घेऊन पळून केला. त्या मुलीने पोलिसात तक्रार दिली होती.

Loading...


दिल्लीतून अभिषेक हरिव्दारला गेला आणि आपण एका अध्यात्मिक चॅनेलचे मालक असल्याचीही बतावणी केली. अभिषेक हा पूर्वी एका चॅनलवर भविष्य सांगायचा नंतर त्याच्या तक्रारी आल्यानंतर त्याला काढून टाकण्यात आलं होतं अशी माहितीही पोलिसांनी दिली. दिल्ली पोलिस त्याची चौकशी करत असून त्यांना अनेक तक्रारीही मिळाल्या आहेत.
 

VIDEO : ...आणि शेतकऱ्यांनी थांबवलं उद्धव ठाकरेंचं भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...