सूरत, 11 नोव्हेंबर : तुरुंगात गेल्यानंतर कैदी हा जीवनाला कंटाळतो किंवा आणखी गुन्हेगारी प्रवृत्तीचा होतो. तुरुंगात जाऊन कोणी आपलं भविष्य घडवायचा विचार केला असेल असं फार कमी वेळा झालं आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये असा एक प्रकार घडला आहे. इथे राहणारे भानुभाई पटेल यांनी तुरूंगात असताना 8 वर्षांत 31 डिग्री मिळवल्या. तुरूंगातून सुटका होताच त्यांना सरकारी नोकरीची ऑफरही मिळाली. नोकरीनंतर त्यांनी 5 वर्षांत आणखी 23 डिग्री मिळवल्या. त्यानंतर भानुभाई पटेल यांचं नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये सुद्धा नोंदलं गेलं आहे.
तुरुंगात का जावं लागलं?
59 वर्षीय भानुभाई पटेल हे भावनगरच्या महुवा तालुक्यामध्ये राहणारे आहेत. अहमदाबादच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची डिग्री घेतल्यानंतर ते 1992 मध्ये मेडिकलची डिग्री मिळावण्यासाठी अमेरिकेत गेले. त्यांचा एक मित्र अमेरिकेत स्टुडंट व्हिसावर काम करत असताना त्याचा पगार भानुभाईंच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर करत होता. यामुळे त्यांच्यावर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन एक्ट (FERA) उल्लंघन केल्याचा आरोप झाला. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 10 वर्षे त्यांना अहमदाबाद तुरूंगात काढावी लागली.
हे वाचा-15 सेकंदात टायगर झाल्या 4 मुली, वाचून आश्चर्य वाटत असेल तर पाहा VIDEO
आंबेडकर यूनिव्हर्सिटीकडून नोकरीची ऑफर
एरवी तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. परंतु तुरूंगातून सुटका झाल्यानंतर भानुभाई पटेल यांना आंबेडकर यूनिवर्सिटीकडून नोकरीची ऑफर मिळाली. भानुभाईंनी नोकरीनंतर 5 वर्षांत आणखी 23 डिग्री मिळवल्या. अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत 54 पदव्या मिळवल्या आहेत.
तुरूंगातील अनुभवांवर लिहिली तीन पुस्तकं
भानुभाईंनी कोरोना महामारीमुळे लॉकडाउनच्या वेळी, तुरुंगात असतानाच्या आपल्या अनुभवापासून ते जागतिक स्तरावरील रेकॉर्ड्स पर्यंतच्या प्रवासावर गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत तीन पुस्तकं लिहिली आहेत. गुजराती पुस्तकाचं नाव 'जेलना सलिया पाछळ की सिद्धि', इंग्रजी पुस्तकाचं नाव 'BEHIND BARS AND BEYOND' आहे. भानुभाई यांनी 13व्या गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रिसायडिंग ऑफिसर म्हणूनही काम केलं आहे.
हे वाचा-कथित लव्ह-जिहादच्या जाहिरातीनंतर Tanishq पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावरुन टीका
तुरूंगात शिक्षित कैद्यांची संख्या जास्त
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार गुजरात तुरूंगात शिक्षित कैद्यांची संख्या अशिक्षितांपेक्षा जास्त आहे. त्यात पदवीधर, इंजिनीयर, पदव्युत्तर पदवी कैदी यांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार गुजरातच्या तुरूंगात 442 पदवीधर, 150 टेक्निकल डिग्री-डिप्लोमा धारक, 213 पदव्युत्तर पदवीधारक कैदी आहेत. बहुतेक आरोपी खून आणि अपहरणाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहेत.