भररस्त्यात आईवडील, पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; नंतर केली आत्महत्या

एका व्यक्तीनं स्वतःच्याच कुटुंबातील चार जणांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 06:23 PM IST

भररस्त्यात आईवडील, पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या; नंतर केली आत्महत्या

बंगळुरू, 16 ऑगस्ट : एका व्यक्तीनं स्वतःच्याच कुटुंबातील चार जणांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीचं नाव ओम प्रकाश असं आहे. ओम प्रकाशनं फिरण्याच्या बहाण्यानं कुटुंबीयांना मैसूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडलूपेट येथे नेलं होतं. यादरम्यानच त्यानं सुरुवातीला आई-वडील, त्यानंतर पत्नी आणि पोटच्या मुलावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यानंतर त्यानं स्वतःचंही आयुष्य संपवलं. कर्नाटकातील चामराजनगर येथील ही धक्कादायक घटना आहे.

(वाचा : मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत, संपत्तीत दोन दिवसांत झाली 29 हजार कोटींची वाढ)

घटनेत या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठत मृतदेह पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांनी गुंडलूपेटमधील नंदी लॉजमध्ये कुटुंबीयांना नेलं होतं. कुटुंबीयांना शहर फिरवण्याच्या बहाण्यानं त्यानं घराबाहेर आणलं आणि भररस्त्यातच त्यांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

(वाचा : घटस्फोटानंतर अमृतानं मागितले ‘इतके’ कोटी, सैफनं हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम)

Loading...

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून रिव्हॉल्वर ताब्यात घेतली. पण ओम प्रकाशनं कुटुंबीयांना जीवे ठार का मारलं? यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे कर्जबाजारीपणाला कंटाळून ही घटना घडली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशीदेखील सुरू केली आहे.

शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...