नात्यांचा खुनी खेळ; 2 महिन्याच्या मुलीसह 3 मुलं आणि पत्नीचा गळा चिरला!

नात्यांचा खुनी खेळ; 2 महिन्याच्या मुलीसह 3 मुलं आणि पत्नीचा गळा चिरला!

दिल्लीतील महरौली परिसरात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून: दिल्लीतील महरौली परिसरात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. येथील वॉर्ड नंबर 2 मध्ये राहणाऱ्या खासगी क्लासच्या शिक्षकाने पत्नीसह 3 मुलांची हत्या केली. उपेंद्र शुक्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार उपेंद्र गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि त्यामुळेच त्याने हे कृत्य केले आहे. काही दिवसांपासून उपेंद्रची प्रकृती ठिक नव्हती आणि त्यातून आलेल्या नैराश्याने त्याने संपूर्ण कुटुंबालाच संपवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री एकच्या सुमारास त्याने सर्वांची हत्या केली.

दक्षिण दिल्लीच्या डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर उपेंद्रने हत्येनंतर एक नोट लिहली आहे. या नोटमध्ये त्याने सर्वांची हत्या केल्याची कबूली दिली आहे. पत्नी आणि 3 मुलांची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ला चाकूने मारून घेण्याचा प्रयत्न केला. तो या घटनेनंतर पळाला नाही. पोलिसांनी त्याला घरीच अटक केली.

या घटनेतील आणखी एक धक्कादायकबाब म्हणजे उपेंद्रची आई देखील त्याच घरात राहत होती. त्याने सर्वांची हत्या केली तेव्हा आई घरतच होती. सकाळी त्याने दरवाजा उघडला नाही म्हणून आईने शेजारच्यांना बोलवले.पोलीस सकाळी साडे सातच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले आणि उपेंद्रला अटक केली.

मुलांवर दया आली नाही...

उपेंद्रला दोन मुली आणि एक मुलगा आहे. सर्वात मोठी मुलगी 7 वर्षांची आहे. तर मुलगा 5 वर्षाचा आहे. सर्वात लहान असलेली मुलगी केवळ 2 महिन्यांची आहे. उपेंद्रने या सर्वांची कटरने हत्या केली. त्याला 2 महिन्याच्या मुलीची हत्या करताना देखील काहीच वाटले नाही.

निराश आहे म्हणून मारले

पोलिसांनी उपेंद्रला अटक करून चौकशी केली. या चौकशीत तो वारंवार एकच गोष्ट सांगित होता मी डिप्रेशनमध्ये आहे. पत्नी आणि मुलांची हत्या का केली याचे ठोस उत्तर त्याच्याकडे नव्हते. पोलिसांना तो मी त्रस्त आहे असे एकच उत्तर देत होता. अर्थात पोलीस या हत्येमागील अन्य बाजूंचा तपास करत आहेत.

VIDEO: भाजप-शिवसेनेत पुन्हा ठिणगी, 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'

First published: June 22, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या