राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयावरुन एकाची हत्या

राजस्थानमध्ये गाय तस्करीच्या संशयावरुन एकाची हत्या

गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी एका 14 व्यक्तींना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू

  • Share this:

05 एप्रिल : गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी एका 14 व्यक्तींना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. एक एप्रिल रोजी ही घटना घडली.

राजस्थानमध्ये जवळपास 100 गोरक्षकांनी 14 जणांना बेदम मारहाण केली. त्यात हरियाणातल्या एका मुस्लीम व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्याचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे लोक राजस्थानातून गायींची तस्करी करत असल्याचा संशय गोरक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. पण आतापर्यंत कुणालाही अटक केलेली नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 08:21 PM IST

ताज्या बातम्या