VIRAL VIDEO : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाने मारली उडी! ठोका चुकवणारं CCTV फूटेज

VIRAL VIDEO : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाने मारली उडी! ठोका चुकवणारं CCTV फूटेज

प्राणीसंग्रहालयात सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाची उडी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा प्राणी संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे. गुरुवारी एक तरुण थेट दिल्लीतील प्राणी संग्रहालयात सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला. हा तरुण बिनधास्त सिंहासमोर जाऊन ठाण मांडून बसल्यानं स्थानिकांच्या काळजाचा ठोका क्षणासाठी चुकला. मात्र सिंहानं या तरुणाला काही केलं नाही. सिंहही त्या तरुणाकडे पाहात एका जागी उभा राहिला. हा घटनेची माहिती मिळताच प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी घाव घेतली आणि त्या युवकाची सुटका केली. हा सगळा प्रकार पाहण्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्याबाहेर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

सिंहाच्या पिंजऱ्यात जाणारा तरुण मनोरुग्ण

सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारहाणा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. हा तरुण त्याच्या नातेवाईकांसोबत प्राणी संग्रहालयात फिरण्यासाठी आला होता. काही कळण्याआधीच त्याने सिंहाला पाहून त्याच्या कुशीत उडी घेतली आणि समोर जाऊन बसला. त्याने झोपून दाखवल, उठून बसला असे त्याचे चाळे चालू होते. सुदैवानं सिंह मात्र एका जागी उभं राहून सगळा प्रकार पाहात होता. त्याने तरुणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवली नाही. हा सगळा प्रकार पिंजऱ्याबाहेरचे लोक पाहात होते आणि एकच गोंधळ चालू झाला. प्राणी संग्रहालयातील हा गोंधळ लक्षात येताच तातडीनं कर्मचाऱ्यांनी धाव घेत तरुणाला बाहेर काढलं. तरुणाजवळ सिंह असल्यानं दोघांनाही कोणतीही इजा न पोहोचवता तरुणाला बाहेर काढणं हे कर्मचाऱ्यांसमोरचं मोठं आव्हान होतं.

वारंवर अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतरही प्राणी संग्रहालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हा तरुण आत गेलाच कसा आणि तिथे सुरक्षा रक्षक नव्हता का? य़ाबाबत कोणतीही अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र याचा तपास पोलीस आणि वन अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 17, 2019, 2:56 PM IST
Tags: delhilion

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading