• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेल्फीच्या नादत 50 फूट खाली कोसळला, तुटलं कंबरेचं हाड
  • VIDEO : सेल्फीच्या नादत 50 फूट खाली कोसळला, तुटलं कंबरेचं हाड

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2018 01:57 PM IST | Updated On: Aug 1, 2018 02:00 PM IST

    01 ऑगस्ट : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ घटराणी धबधब्यावर उभ राहून सेल्फी काढणं एका तरुणाला इतकं महागात पडलं की त्यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. सुत्रांच्या माहितीनुसार, जोरदार पाण्याच्या प्रवाहात उभं राहून एक तरूण सेल्फी काढत होता पण पाण्याचा प्रवाह इतका होती की तो तिथून घसरला आणि थेट 50 फूट खाली कोसळला. यात तरूणाच्या कंबरेचं हाडच मोडली आहे. अभनपुरच्या सारखी गावातील काही तरूण पिकनिक करण्यासाठी घटराणी धबधब्यावर गेले होते. मस्ती करण्याच्या नादात सगळे मित्र धबधब्यावर गेले आणि सेल्फी काढत होते. त्यात पाण्याच्या अति प्रवाहामुळे एकाचा तोल गेला आणि तो धबधब्यावरून खाली कोसळला. त्याला लगेच रुग्णालयात भरती करण्यात आलं. पण या अपघात त्याच्या कंबरेचं हाड मोडलं आहे. इतर पर्यटकांनी शूट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close