उडत्या विमानातून खाली पडून एकाचा मृत्यू ! नेमका काय घडला प्रकार?

उडत्या विमानातून खाली पडून एकाचा मृत्यू ! नेमका काय घडला प्रकार?

लंडनच्या वरून जाणाऱ्या केनिया एअरवेजच्या विमानातून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हे विमान 3500 फुटांवरून उडत होतं. त्यावेळी हा माणूस एका घराजवळच्या बागेत पडला. त्याला असं अचानक पडलेलं पाहून तिथले लोकही घाबरले. हा नेमका काय प्रकार झाला हे कुणालाही कळेना.

  • Share this:

लंडन, 2 जुलै : लंडनच्या वरून जाणाऱ्या केनिया एअरवेजच्या विमानातून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.हे विमान 3500 फुटांवरून उडत होतं. त्यावेळी हा माणूस एका घराजवळच्या बागेत पडला. त्याला असं अचानक पडलेलं पाहून तिथले लोकही घाबरले. हा नेमका काय प्रकार झाला हे कुणालाही कळेना.

या प्रकारानंतर कळलं की हा माणूस विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बसून प्रवास करत होता. काही स्थलांतरित अशा प्रकारे विमानामध्ये लपून प्रवास करत असतात. पण हा मात्र असा प्रवास करताना फसला आणि मृत्युमुखी पडला. स्थलांतरितांचा हा बेकायदेशीर प्रवासाचा मार्ग खूपच विचित्र आहे.

पावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी!

केनिया एअरवेजचं हे विमान लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर लँडिंग करण्यासाठी खाली आणलं गेलं. त्याचवेळी तो विमानातून खाली पडला. हे विमान लँड झालं तेव्हा गिअर कम्पार्टमेंटमधून एक बॅग आणि काही खाण्यापिण्याच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यावेळी हा माणूस इथे लपून बसल्याचं कळलं.

बागेतले लोकही वाचले

लंडनमध्ये ज्या रहिवाशाच्या घराजवळच्या बागेत त्याचा मृतदेह पडला तिथल्या लोकांना धक्काच बसला. या माणसाचा मृतदेह माझ्या अंगावर पडला नाही म्हणून मी वाचलो, असं या घरमालकाने सांगितलं.त्याचवेळी आणखी एकाने सांगितलं की तो घरामध्ये झोपला होता. जेव्हा जोराचा आवाज आला तेव्हा त्याची झोप उडाली. त्याने बाहेर येऊन पाहिलं तर या माणसाचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत त्याला दिसला.

केनिया एअरवेजचं नैरोबीहून निघालेलं हे विमान रविवारी साडेतीनच्या सुमाराला आमच्या घरावरून गेलं, असं इथल्या रहिवाशांनी सांगितलं. हे विमान लँडिंगच्या तयारीत होतं. त्याचवेळी विमानातल्या लँडिंग गिअरमध्ये लपून बसलेला हा बेकायदेशीररित्या प्रवास करणारा प्रवासी खाली पडला.

=====================================================================================

VIDEO: संजय राऊत का होतायत ट्रोल? इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: July 2, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading